न्यू पॅलेस परिसरातून पुन्हा चंदनाच्या झाडांची चोरी

By उद्धव गोडसे | Published: November 22, 2023 12:59 PM2023-11-22T12:59:39+5:302023-11-22T13:03:12+5:30

याबाबत सतीश मारुती शिंदे (वय ५१, रा. राजारामपुरी, १४ वी गल्ली, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Another theft of sandalwood trees from the New Palace area | न्यू पॅलेस परिसरातून पुन्हा चंदनाच्या झाडांची चोरी

न्यू पॅलेस परिसरातून पुन्हा चंदनाच्या झाडांची चोरी

कोल्हापूर : न्यू पॅलेसच्या पश्चिम दिशेला असलेल्या तुळजाभवानी मंदिर परिसरातील चंदनाच्या तीन झाडांचे बुंदे चोरट्याने लंपास केले. हा प्रकार मंगळवारी (दि. २१) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. 

याबाबत सतीश मारुती शिंदे (वय ५१, रा. राजारामपुरी, १४ वी गल्ली, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. न्यू पॅलेसच्या परिसरात चंदनाची अनेक झाडे आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या तरीही चोरीचे प्रकार थांबलेले नाहीत. चोरट्यांनी मंगळवारी दुपारी तीन झांडांचे बुंदे तोडून लांबविले. अंदाजे दीड फूट घेर असलेले १५ हजार रुपये किमतीचे चंदनाचे तीन बुंदे चोरीला गेल्याचा उल्लेख सतीश शिंदे यांनी फिर्यादीत केला आहे. 

न्यू पॅलेस परिसरातून यापूर्वीही चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. चोरीचे प्रकार रोखण्यासाठी काही झाडांच्या खोडांभोवती काँक्रीटीकरण केले आहे. तरीही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Another theft of sandalwood trees from the New Palace area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.