भोगावती महाविद्यालय येथे एड्स विरोधी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:39 AM2020-12-12T04:39:14+5:302020-12-12T04:39:14+5:30
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली लोटस मेडिकल फाऊंडेशन कोल्हापूर व भोगावती महाविद्यालय, कुरुकली यांच्या वतीने ...
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली लोटस मेडिकल फाऊंडेशन कोल्हापूर व भोगावती महाविद्यालय, कुरुकली यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘‘एड्स जनजागृत’’ कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. यावेळी प्रा. एस. के. परीट अध्यक्षस्थानी होते. लोटस मेडिकल फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक अमित गायकवाड, प्रा. पवन पाटील, प्रा. राहुल चौगले, प्रा. डी. एस. पाटील, प्रा. संदीप चौगले प्रमुख होते.
प्रा. पवन पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये एचआयव्ही, टी.बी., कोरोना याचबरोबर कर्करोगाबद्दलही जनजागृती व समुपदेशनाची गरज असल्याचे सांगितले.
प्रकल्प समन्वयक अमित गायकवाड यांनी संस्थेमार्फत एड्स क्षेत्रात चालू असलेल्या कामाबद्दल व शासकीय योजनांबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. राहुल चौगले यांनी केले. आभार प्रा. डी. एस. पाटील यांनी मानले.
फोटो ओळी : कुरुकली (ता. करवीर) येथील भोगावती महाविद्यालय येथे एड्स जनजागृती कार्यशाळा आयोजित केली होती. त्या कार्यशाळेत बोलताना डॉ. विनायक देसाई. यावेळी प्रा.पवन पाटील, प्रा. एस. के. परीट आदी.
युध्द जिंकायचे आहे, ते सामायिक जबाबदारीने – डॉ.विनायक देसाई