टोल विरोधी लढ्याचे नेते निवासराव साळोखे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 09:29 AM2021-08-31T09:29:52+5:302021-08-31T09:30:20+5:30
कोल्हापुरात आयआरबी कंपनीने खासगीकरणातून केलेल्या रस्ते प्रकल्पाच्या विरोधात जे मोठे आंदोलन झाले आणि त्याची दखल घेऊन राज्य सरकारला टोल रद्द करावा लागला त्या आंदोलनाचे निवासराव साळोखे हे मुख्य सूत्रधार होते.
कोल्हापूर : कोल्हापूरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक आंदोलनांचे वैचारिक स्रोत असलेले निवासराव साळोखे उर्फ तात्या (वय 72) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले.
कोल्हापुरात आयआरबी कंपनीने खासगीकरणातून केलेल्या रस्ते प्रकल्पाच्या विरोधात जे मोठे आंदोलन झाले आणि त्याची दखल घेऊन राज्य सरकारला टोल रद्द करावा लागला त्या आंदोलनाचे निवासराव साळोखे हे मुख्य सूत्रधार होते. सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून सलग पाच वर्षे त्यांनी हा लढा चालवला आणि यशस्वी करून दाखवला.
खरेतर रस्ते प्रकल्पाच्या विरोधातील लढा हा खासगीकरणाच्या धोरणाविरोधात होता. म्हणून राज्य सरकार टोल रद्द करायला तयार नव्हते. पण कोल्हापूरने आम्ही टोल देणार नाही, अशी एकच भूमिका घेतली आणि निवासराव साळोखे यांच्यासारखे शेकडो कार्यकर्ते त्यात उतरले. म्हणून हा लढा यशस्वी झाला.त्यामुळे टोल आंदोलन म्हटल की निवासराव तात्या अशी एक ओळख तयार झाली होती.आज त्यांच्या निधनाने एक संघर्षपूर्ण कार्यकर्ता कायमचा हरपला.