संकेश्वरमध्ये विनाकारण फिरणा-यांची अँटिजन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:47+5:302021-06-02T04:19:47+5:30

संकेश्वर : कर्नाटक कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संकेश्वर पोलीस व पालिका प्रशासनाने अचानक आज (मंगळवारी) विनाकारण व विनामास्क बाहेर ...

Antigen detection of unintentional roaming in Sankeshwar | संकेश्वरमध्ये विनाकारण फिरणा-यांची अँटिजन तपासणी

संकेश्वरमध्ये विनाकारण फिरणा-यांची अँटिजन तपासणी

Next

संकेश्वर : कर्नाटक कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी संकेश्वर पोलीस व पालिका प्रशासनाने अचानक आज (मंगळवारी) विनाकारण व विनामास्क बाहेर फिरणा-यांची अँटिजन तपासणी केली. यामध्ये संशयित तिघांना कोविड काळजी केंद्रात पाठविण्यात आले.

कर्नाटक सरकारने ७ जूनअखेर लॉकडाऊन लागू केला असतानाही काही दुचाकीस्वार विनाकारण शहरातून फेरफटका मारत आहेत.

दरम्यान, पोलीस, आरोग्य व पालिकेच्या पथकाने हुक्केरी रोडवर विनाकारण व विनामास्क फिरणा-या १०३ नागरिकांचे स्वॅब घेतले. त्यातील १०० जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार असून त्याचा अहवाल ५ दिवसांनी मिळणार आहे. या तपासणीत तिघेजण संशयित आढळले आहेत.

--------------------------

फोटो ओळी : संकेश्वर येथे पालिका, पोलीस व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विनाकारण बाहेर पडणा-या नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली.

क्रमांक : ०१०६२०२१-गड-०५

Web Title: Antigen detection of unintentional roaming in Sankeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.