शिरोळमध्ये व्यापारी, विक्रेत्यांची अँटिजन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:17 AM2021-06-06T04:17:59+5:302021-06-06T04:17:59+5:30

शिरोळ : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहर हॉटस्पॉट बनत आहे. याची ...

Antigen inspection of traders and vendors in Shirol | शिरोळमध्ये व्यापारी, विक्रेत्यांची अँटिजन तपासणी

शिरोळमध्ये व्यापारी, विक्रेत्यांची अँटिजन तपासणी

Next

शिरोळ : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहर हॉटस्पॉट बनत आहे. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शनिवारी शहरातील १२४ व्यापारी, भाजी विक्रेते यांच्याबरोबर लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये एका आरोग्य कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

शहरात कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील नगरपालिका व ग्रामीण रुग्णालय यांच्यावतीने व्यापारी, भाजीपाला विक्रेते यांची अँटिजन तपासणी मोहीम छत्रपती श्री शिवाजी तख्त येथे आयोजित केली होती. त्यामध्ये १२४ तपासण्या झाल्या. कोविड सेंटरकडे काम करणारा कर्मचारी पॉझिटिव्ह आला. यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, मुख्याधिकारी तैमुर मुलांणी, संदीप चुडमुंगे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

चौकट..

विनाकारण फिरणाऱ्यांची होणार तपासणी

शिरोळ शहरामध्ये विनाकरण फिरणारे तसेच लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची अँटिजन तपासणी केली जाणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला तत्काळ शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.

Web Title: Antigen inspection of traders and vendors in Shirol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.