आलासमध्ये व्यापाऱ्यांसह संशयितांची अँटिजन तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:26 AM2021-05-25T04:26:14+5:302021-05-25T04:26:14+5:30
बुबनाळ : आलास (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने व्यापारी व आजारी असणाऱ्या ग्रामस्थांची अँटिजन तपासणी करण्यात आली. दोन दिवसांत १२५ ...
बुबनाळ : आलास (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने व्यापारी व आजारी असणाऱ्या ग्रामस्थांची अँटिजन तपासणी करण्यात आली. दोन दिवसांत १२५ जणांच्या घेण्यात आलेल्या तपासणीमध्ये आठजण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना ए. बी. हायस्कूलमध्ये संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी आलास ग्रामपंचायतीच्यावतीने उपाययोजना सुरू आहेत. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर आजारी व्यापारी व ग्रामस्थ यांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये आठजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी भीम बोरगावे यांच्यासह वैद्यकीय पथकाने ही तपासणी केली. यावेळी सरपंच सचिन दानोळे, फैजलअल्ली पाटील, ग्रा. पं. सदस्य कृष्णा गावडे, सदा कांबळे, रमेश मगदूम, वासिम जमादार, मुखसूर मखमल्ला यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - २४०५२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - आलास (ता. शिरोळ) येथे व्यापारी व आजारी ग्रामस्थांची अँटिजन तपासणी करण्यात आली.