कोपार्डे येथे १३० लोकांची अँटिजन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:32 AM2021-04-30T04:32:12+5:302021-04-30T04:32:12+5:30
कोपार्डे : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोपार्डे व कुडित्रे, ता. करवीर येथील व्यापारी, ग्रामस्थ यांच्या आरोग्य विभाग व ग्रामपंचायत ...
कोपार्डे : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोपार्डे व कुडित्रे, ता. करवीर येथील व्यापारी, ग्रामस्थ यांच्या आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या वतीने अँटिजन टेस्ट करण्यात आली. स.ब. खाडे महाविद्यालय येथे १३० जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात चार जण कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कोपार्डे येथे सांगरूळ फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल, बेकरी, किराणा व मेडिकल दुकानदार आहेत. याच बरोबर भाजीपाला विक्रीसाठी शेजारील गावातून शेतकरी महिला येत असतात. येथे सकाळी व सायंकाळी मोठा गर्दी असते. त्यांचा थेट संपर्क येत असल्याने समूह संसर्गाचा धोका वाढण्याचा संभव ओळखून ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने आज तपासणीची मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी कोपार्डे सरपंच शारदा पाटील, कुडित्रे सरपंच रूपाली पाटील, उपसरपंच सरदार जामदार, ग्रामविकास अधिकारी महेश पाटील, सरदार दिंडे, तलाठी श्रीकांत भोसले, भूषण पाटील, केशव पाटील, प्रदीप पाटील, आरोग्यसेवक अरुण कराळकर, आरोग्यसेविका आर.पी. पारकर, कोतवाल व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.