जयसिंगपुरात अँटिजेन चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:18 AM2021-04-29T04:18:04+5:302021-04-29T04:18:04+5:30
शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील दहावी ते तेरावी गल्लीपर्यंत दररोज भाजीपाला विक्रेते बसत असल्याने हा ...
शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील दहावी ते तेरावी गल्लीपर्यंत दररोज भाजीपाला विक्रेते बसत असल्याने हा परिसर बॅरिकेड लावून मंगळवारी सील करण्यात आला. मुख्याधिकारी टिना गवळी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णवाहिकेतून ही मोहीम सुरु झाली आहे. यावेळी आरोग्य विभागाचे संदीप कांबळे, प्रमोद जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. विक्रेत्यांबरोबरच रिक्षाचालक त्याचबरोबर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची देखील तपासणी केली जात आहे. शहरात जागोजागी अँटिजेन पद्धतीची कोरोना टेस्टची मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. फोटो - २८०४२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळी - जयसिंगपूर शहरात पालिकेकडून अँटिजेन कोरोना तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.