खासगी बसमधील प्रवाश्यांची ॲन्टीजेन चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 07:48 PM2021-04-22T19:48:22+5:302021-04-22T19:49:44+5:30

CoronaVirus Kolhapur :वाढत्या कोरोना संसर्गामुळे खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची आता ॲन्टीजेन चाचणी करण्यात येणार आहे. त्यांच्या हातावर १४ दिवस गृह अलगीकरणाचे शिक्के मारण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी परिवहन महामंडळ व खासगी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घ्यावी असेही त्यांनी सुचवले.

Antigen testing of passengers in private buses | खासगी बसमधील प्रवाश्यांची ॲन्टीजेन चाचणी

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी खासगी वाहतुक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून प्रवाश्यांची ॲन्टीजेन चाचणी करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देखासगी बसमधील प्रवाश्यांची ॲन्टीजेन चाचणी जिल्हाधिकारी दौलत देसाई : हातावर गृहविलगीकरणाचा शिक्का मारणार

कोल्हापूर :वाढत्या कोरोना संसर्गामुळे खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची आता ॲन्टीजेन चाचणी करण्यात येणार आहे. त्यांच्या हातावर १४ दिवस गृह अलगीकरणाचे शिक्के मारण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी परिवहन महामंडळ व खासगी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी खासगी प्रयोगशाळांची मदत घ्यावी असेही त्यांनी सुचवले.

राज्य शासनाने प्रवासावर घातलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ही सुचना केली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार अर्चना कापसे, रंजना बिचकर यांच्यासह खासगी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या बसेससाठी तालुकास्तरावर ठिकाणे निश्चित करा. या प्रवाशांची ॲन्टीजेन टेस्ट करुन त्यांच्या हातावर १४ दिवस गृह अलगीकरणाचे शिक्के मारावेत. शक्यतो प्रवास सुरू करण्यापूर्वीच प्रवाशांची ॲन्टीजेन चाचणी करावी. खासगी प्रयोगशाळेच्या मदतीने या चाचण्या वाहतूक संस्थेने करावेत. परिवहन मंडळानेही याबाबत नियोजन करावे. रेल्वेमधून येणाऱ्या प्रवाशांसाठीही रेल्वे प्रबंधक यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने नियोजन करावे. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभागाने ठिकाणे निश्चित करावीत. तसेच शासनाने प्रवासावर घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असेही ते म्हणाले.
 

Web Title: Antigen testing of passengers in private buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.