‘स्मॅक’कडून दीड हजारांहून अधिक कामगारांची अँटिजेन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:22 AM2021-05-01T04:22:12+5:302021-05-01T04:22:12+5:30

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सुरू असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांची कोरोना ...

Antigen tests of more than one and a half thousand workers from Smack | ‘स्मॅक’कडून दीड हजारांहून अधिक कामगारांची अँटिजेन टेस्ट

‘स्मॅक’कडून दीड हजारांहून अधिक कामगारांची अँटिजेन टेस्ट

Next

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सुरू असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आणि लसीकरण जिल्हाधिकारी यांनी बंधनकारक केले आहे.

त्यासाठी हे कॅम्प निश्चितच फायदेशीर ठरेल, असा विश्वास ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील यांनी व्यक्त केला.

कॅम्पमध्ये १५०० हून अधिक जणांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट व ५०० जणांनी लसीकरण करून घेतले.

यापुढेही हे कॅम्प चालू राहणार आहेत, तरी जास्तीत जास्त उद्योजक, कामगार, स्टाफ यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन ‘स्मॅक’ने केले आहे. या कार्यक्रमास औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनाजी इंगळे, क्षेत्र व्यवस्थापक सागर पवार, कार्यकारी अभियंता सुभाष मोरे, उपअभियंता इराप्पा नाईक, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्यूज, प्रशांत घोलप, डॉ. संजय देसाई, डॉ. रवी तेजा, रवी कुंभार, सोनल पोवार, ‘स्मॅक’चे उपाध्यक्ष दीपक पाटील, संचालक जयदीप चौगले, एम. वाय. पाटील, राजू पाटील, अमर जाधव, नीरज झंवर, जयदत्त जोशिलकर, श्यामसुंदर तोतला, सुरेंद्र जैन, प्रशांत शेळके, दीपक परांडेकर, भरत जाधव आदी उपस्थित होते.

फोटो : ३० शिरोली स्मॅक लसीकरण

ओळी :-

शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) येथे कोविड प्रतिबंधात्मक लस घेताना उद्योजक तुकाराम पाटील. यावेळी डॉ. सुहास कोरे, ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, दीपक पाटील, एम. वाय. पाटील, नीरज झंवर, राजू पाटील, अमर जाधव उपस्थित होते.

Web Title: Antigen tests of more than one and a half thousand workers from Smack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.