नृसिंहवाडीत ९६ व्यापारी, रिक्षाचालकांची अँटिजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:41+5:302021-05-27T04:24:41+5:30
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथे ९६ व्यापारी, रिक्षाचालक यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गेल्या काही दिवसांत वाढत आलेल्या रुग्णांच्या संख्येवर ब्रेक ...
नृसिंहवाडी : नृसिंहवाडी येथे ९६ व्यापारी, रिक्षाचालक यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने गेल्या काही दिवसांत वाढत आलेल्या रुग्णांच्या संख्येवर ब्रेक लागला. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
शिवसेनेचे युवासेनेचे प्रतीक धनवडे यांनी श्री दत्त व्यापारी असोसिएशन नृसिंहवाडी दुकानदार व मालक, रिक्षाचालक यांची कोरोना अँटिजन तपासणी मोफत करण्यासाठी साहित्याची उपलब्धता करून दिली होती.
प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा तंत्रज्ञ भीम बोरगावे, डॉ. प्रांजली पाटील, डॉ. अनिकेत यांनी कोरोना तपासणी केली.
यावेळी अनंत धनवडे, शशिकांत बड्डपुजारी, आनंद पुजारी, सुनील धनवडे, दिगंबर शेलार, गुरूप्रसाद धनवडे, जयवंत पतंगे, अवधूत धनवडे, हेमंत गवळी, संदीप पवार, योगेश गवळी, योगेश खिरूगडे, सागर मोरबाळे, गणेश सुतार, नीलेश बावलेकर, सुशील गवळी, संजय बड्डपुजारी, मंगेश शिंदे उपस्थित होते.
फोटो - २६०५२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - नृसिंहवाडी येथे व्यापारी व रिक्षाचालकांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यावेळी प्रयोगशाळा तंत्रज्ञ भीम बोरगावे, अनंत धनवडे, डॉ. पाखरे, सुनील धनवडे, प्रतीक धनवडे, डॉ. प्रांजली पाटील उपस्थित होत्या.