अन्वी ठरली देशातील पहिली "यंगेस्ट माऊंटनर"; कोल्हापुरात दिला चषक

By संदीप आडनाईक | Published: January 30, 2023 11:49 PM2023-01-30T23:49:43+5:302023-01-30T23:51:44+5:30

अन्वीच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि अशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.

Anvi became the country's first Youngest Mountaineer; Cup given in Kolhapur | अन्वी ठरली देशातील पहिली "यंगेस्ट माऊंटनर"; कोल्हापुरात दिला चषक

फोटो ओळी : कोल्हापुरात मेरी वेदर ग्राउंडवर रविवारी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तसेच वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अध्यक्ष यशवंत राऊत यांच्याकडून अन्वी घाटगे हिला देशातील पहिली "यंगेस्ट माऊंटनर " किताबाचे चषक, प्रमाणपत्र, टी-शर्ट देण्यात आले.

googlenewsNext

कोल्हापूर : दोन वर्षे ११ महिन्याची असताना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर करणाऱ्या कोल्हापुरातील अन्वी चेतन घाटगे हिच्या कामगिरीची वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीने दखल घेऊन तिला "यंगेस्ट माऊंटनर " हा किताब रविवारी दिला. हे शिखर सर करणारी ती देशातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरली आहे. 

अन्वीच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि अशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. तिच्या ह्या कामगिरीची वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीने दखल घेऊन तिला "यंगेस्ट माऊंटनर " हा किताब देणार असल्याची घोषणा ८ जानेवारी रोजी केली होती.

वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीची टीम कोल्हापुरात मेरी वेदर ग्राउंडवर रविवारी दुपारी ३.३० वाजता आलेली होती. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते तसेच वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटीचे अध्यक्ष यशवंत राऊत यांच्याकडून अन्वीला चषक, प्रमाणपत्र, टी-शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले. 

अन्वीने कळसुबाईवर भर पावसात अवघ्या तीन तासात चढाई करत जागतिक विक्रम नोंदविला. लहान वयामध्ये मोठ्या स्वप्नांची चढाई करण्याचा ध्यास घेणाऱ्या अन्वीचा आम्हास सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. तिच्या कर्तृत्वास मानाचा सलाम आहे, असे उद्गगार खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यक्रमाच्या वेळी काढले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉ. विलास किल्लेदार, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक,अन्वीची आई अनिता, वडील चेतन उपस्थित होते.

 

Web Title: Anvi became the country's first Youngest Mountaineer; Cup given in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.