अवीट हिंदी, मराठी गीतांनी अपर्णा मयेकर यांनी रंगवली सुरेल मैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 04:49 PM2018-08-21T16:49:58+5:302018-08-21T16:55:54+5:30
ऐन दुपारी, आसावल्या मनाला, ओ हनिसा जुल्फो वाली, निगाहे मिलाने को जी चाहता अशा अवीट हिंदी, मराठी गीतांनी प्रसिद्ध गायिका डॉ. अपर्णा मयेकर यांनी सतरंगी आशा ही मैफल रंगवली.
कोल्हापूर : ऐन दुपारी, आसावल्या मनाला, ओ हनिसा जुल्फो वाली, निगाहे मिलाने को जी चाहता अशा अवीट हिंदी, मराठी गीतांनी प्रसिद्ध गायिका डॉ. अपर्णा मयेकर यांनी सतरंगी आशा ही मैफल रंगवली.
गायन समाज देवल क्लबमध्ये आवटे परिवाराच्या सहकार्याने रसिकांच्या गर्दीत हा कार्यक्रम पार पडला. गीता आवटे, संगीता कलशेट्टी, संजय आवटे, बल्लाळ आवटे, शिवनीता, बिल्वा आवटे, डॉ. भूपाळी, राजेंद्र पित्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रामा रघुनंदना या गीताने मैफलीला प्रारंभ झाला. त्यानंतर का रे दुरावा, आईये मेहरबान, अभी ना जाओ छोडकर, दिल चीज क्या है, छोड दो आँचल अशी सुरेल गाणी त्यांनी सादर केली. सैनिक हो तुमच्यासाठी या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. राजेंद्र मेस्त्री यांचे सहगायन व मनीष आपटे यांचे निवेदन होते. श्रीकांत डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले.