आप्पासाहेब पाटील याना ‘पद्मभूषण’ पुरस्कार दया : मगदूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:25 AM2021-03-23T04:25:43+5:302021-03-23T04:25:43+5:30
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे देण्यात येणाऱ्या निवेदनात, आप्पासाहेब पाटील हे जैन समाजाचे असतानाही, त्यांनी अस्पृश्य समाजाविषयी असलेली आस्था व ...
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे देण्यात येणाऱ्या निवेदनात, आप्पासाहेब पाटील हे जैन समाजाचे असतानाही, त्यांनी अस्पृश्य समाजाविषयी असलेली आस्था व आपुलकीमुळे ते माणगाव येथे अस्पृश्य परिषद होण्याकरिता सर्वात मोठे योगदान दिले होते. आप्पासाहेब पाटील, थोरले नाना मास्तर, नागोजी कांबळे, गणू सनदी, कासिम मास्तर, चंद्राप्पा कांबळे यांच्यासह आदी गावकऱ्यांनी या परिषदेची जबाबदारी स्वीकारून तत्कालीन परिस्थितीमध्ये या ऐतिहासिक माणगाव परिषदेस यशस्वीरित्या संपन्न केले. या परिषदेची मुख्य जबाबदारी आप्पासाहेब पाटील यांची होती. त्यांच्या या उचित कार्याचा गौरव म्हणून आप्पासाहेब पाटील यांना महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कारासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी माणगाव परिषद शताब्दी दिनानिमित्त ग्रामस्थांच्यावतीने केली असल्याचे सांगितले. याप्रसंगी सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, पोलीसपाटील करसिद्ध जोग, तंटामुक्तचे अध्यक्ष सुनील मन्ने, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील, शिरीष मधाळे, अशोक कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.