मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन : २६ जानेवारीला ग्रामपंचायतीत राहणार अनुपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:52 AM2018-01-12T00:52:45+5:302018-01-12T00:52:51+5:30
पाचगाव : २६ जानेवारी हा दिवस राष्टÑीय सण असल्याने या दिवशीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकून इतर सभा नियमातील तरतुदीनुसार घेण्यात येतील
पाचगाव : २६ जानेवारी हा दिवस राष्टÑीय सण असल्याने या दिवशीच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकून इतर सभा नियमातील तरतुदीनुसार घेण्यात येतील, अशी माहिती निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, कोल्हापूर यांना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा शाखेच्यावतीने देण्यात आले.
निवेदनामध्ये दिलेल्या माहितीनुसार २६ जानेवारीला होणाºया ग्रामसभा या प्रचंड वादळी होतात. त्यामध्ये ग्रामसेवकांना मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. दप्तर पळविणे यासारखे प्रकार घडतात.
त्यामुळे ग्रामसेवकांना आपला जीव मुठीत धरून ग्रामसभा घ्याव्या लागतात. त्यामुळे राज्य संघटनेच्या निर्णयाला बांधिल राहून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक २६ जानेवारीला होणाºया ग्रामसभेस हजर राहणार नाहीत; परंतु सदर दिवशीच्या राष्टÑीय कार्यक्रमास हजर राहतील.
महाराष्टÑ ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ७ नुसार आर्थिक वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. दोन सभांतील अंतर हे चार महिन्यांपेक्षा जास्त नसावे, अशी तरतूद आहे. वित्तीय वर्षातील पहिली ग्रामसभा ३० मे पूर्वी घेणे अपेक्षित असून ती १ मे रोजी घेतली पाहिजे असे बंधनकारक नाही. दुसरी ग्रामसभा ९ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट या दरम्यान घ्यावी. १५ आॅगस्टलाच घ्यावी असे बंधन नाही. तिसरी ग्रामसभा सरपंच किंवा उपसरपंच यांनी ठरवून दिलेल्या तारखेस वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात घेतली पाहिजे.
चौथी ग्रामसभा २६ जानेवारीला घेण्याच्या सूचना असल्या तरी २६ जानेवारी हा राष्टÑीय सण असल्याने व सर्व केंद्रीय व राज्य सरकारी शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना सुटी असल्याने या राष्टÑीय सणाला व सुटीचा आनंद ग्रामसेवकांनाही उपभोगता यावा व ग्रामसभा वादळी होऊ नये यासाठी इतर दिवशी घेण्यात यावी. ग्रामसभेचा हेतू हा गावच्या सर्वांगीण विकासावर चर्चा होण्यासाठी असतो; परंतु लोकांच्यादृष्टीने ग्रामसभा ही राजकीय उट्टे काढण्याची जागा, हुल्लडबाजी अशा प्रकारे होत आहे.
या सर्व बाबींचा प्रशासनाने विचार करावा, असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे
देताना जिल्हाध्यक्ष एन. के. कुंभार, राज्य मानद अध्यक्ष साताप्पा मोहिते, वीरेंद्र मगदूम, आप्पा नुल्ले, काका पाटील, ए. एस. कटारे, बाबासोा कापसे, सुखदेव वाडकर, विनोद पाटील, विश्वास पाटील, आदी उपस्थित होते.
शिवीगाळ, धमक्या देण्याचे प्रकार
२६ जानेवारीला होणाºया ग्रामसभा या प्रचंड वादळी होतात.
ग्रामसेवकांना मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.
दप्तर पळविणे यासारखे प्रकार घडतात.