रत्नाकर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:38+5:302021-04-08T04:23:38+5:30
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठवण्याचे आवाहन ...
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवी धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठवण्याचे आवाहन साहित्य सभेच्या वतीने करण्यात आले आहे.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवितासंग्रहासाठी हा राज्यस्तरीय काव्य पुरस्कार सन २०१२ पासून दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. सन २०१९ व २०२० या वर्षाकरता दिनांक १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत प्रकाशित झालेला कवितासंग्रह फोटो परिचयासह कवी, प्रकाशक यांनी दोन प्रतींत २५ एप्रिल २०२१पर्यंत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या ए वाॅर्ड, गाळा क्रमांक ६, स्मृती अपार्टमेंट, बाबुजमाल रस्ता, कोल्हापूर ४१६०१२ या पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
(संदीप आडनाईक)