अर्थशास्त्र सहकार परिषदेसाठी शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:22 AM2020-12-08T04:22:32+5:302020-12-08T04:22:32+5:30
कोल्हापूर येथील कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विचार मंच, कोकण विभाग आणि सांगली येथील कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला यांच्यातर्फे ...
कोल्हापूर येथील कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विचार मंच, कोकण विभाग आणि सांगली येथील कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला यांच्यातर्फे जानेवारी २०२१ मध्ये विचार मंचचे २१ वे वार्षिक अधिवेशन व ऑनलाईन अर्थशास्त्र सहकार परिषद होत आहे. परिषदेत प्रकाशित होणाऱ्या ‘ई-अर्थवेध’ या स्मरणिकेसाठी शोधनिबंध मागविण्यात येत आहेत.
१२वी अर्थशास्त्र पुनर्रचित अभ्यासक्रम व मूल्यमाप पद्धती, १२वी सहकार पुनर्रचित अभ्यासक्रम व मूल्यमापन पद्धती व कोविड-१९ चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम या विषयांवर शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शोधनिबंध हा मराठी किंवा इंग्रजी भाषेत साधारण तीन हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा. मराठीसाठी गुगल युनिकोड, इंग्रजीसाठी एरियल फॉन्टमध्ये असावा. शोधनिबंध पाठविताना शिक्षकांनी स्वत:चे दोन आयडेंटी फोटो मेलद्वारे ं१३ँं२ँं२३१ं५्रूँं१ेंल्लूँ@ॅें्र''''.ूङ्मे. पाठवावेत. शोधनिबंध पाठविण्याची अंतिम मुदत २० डिसेंबर आहे.
तसेच शोधनिबंध या मेल आयडीवर पाठवावा, असेही आवाहन मंचचे अध्यक्ष प्रा. शरद शेटे यांनी केले आहे.
यावेळी प्राचार्य श्रद्धा केतकर, कार्याध्यक्ष समीर गोवंडे, सचिव अनिल निर्मळे, आदी उपस्थित होते.