ॲपल हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपणास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:42 AM2021-03-13T04:42:02+5:302021-03-13T04:42:02+5:30
डॉ. भूपाळी म्हणाले, बहुतांशी रुग्णांवर अँजिओप्लास्टी, बायपास, झडप बदलणे शस्त्रक्रिया केल्यानंतर हृदयाचे कार्य पूर्ववत होेते. मात्र, काही रुग्णांच्या हृदयाची ...
डॉ. भूपाळी म्हणाले, बहुतांशी रुग्णांवर अँजिओप्लास्टी, बायपास, झडप बदलणे शस्त्रक्रिया केल्यानंतर हृदयाचे कार्य पूर्ववत होेते. मात्र, काही रुग्णांच्या हृदयाची कार्यक्षमता केवळ २० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असते. अशावेळी त्यांना औषधे लागू पडत नाहीत. अशा रुग्णांसाठी हृदय प्रत्यारोपण हाच पर्याय शिल्लक राहतो. यासाठी आता आमच्या हॉस्पिटलला परवानगी मिळाली आहे. प्रसिद्ध हृदयशल्यचिकित्सक डॉ. महादेव दीक्षित हे या शस्त्रक्रिया करणार आहेत. मी, डॉ. अलोक शिंदे, डॉ. विनायक माळी, डॉ. शीतल देसाई यांच्यासह मोठी टीम यासाठी उपलब्ध होणार आहे.
डॉ. महादेव दीक्षित म्हणाले, मी ३० वर्षांत २५ हजार हृदयशस्त्रक्रिया केल्या आहेत. यापूर्वी कोल्हापुरातील ब्रेन डेड झालेल्या रुग्णांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला, तर त्याचे हृदय मुंबई, बंगलोर,चेन्नईला विमानाने पाठवावे लागत होते. ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळखाऊ होती. मात्र, आता ॲपल हॉस्पिटल कोल्हापूरमध्येच ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे याचे महत्त्व वेगळे राहणार आहे. संस्थेच्या संचालिका गीता आवटे म्हणाल्या, पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, कर्नाटकातील गरजू व्यक्तींंना याचा मोठा फायदा होणार आहे.
चौकट
एक्मो यंत्रणाही उपलब्ध
फुफ्फुस जेव्हा श्वसनक्रियेसाठी निरुपयोगी ठरते तेव्हा त्यासाठी एक्मो ही यंत्रणा वापरण्यात येते. ही सोयदेखील ॲपल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. या यंत्रणेवर महिनाभर रुग्ण राहू शकतो. त्याला हृदय उपलब्ध झाल्यानंतर पुढची शस्त्रक्रिया करता येते असे सांगण्यात आले.