अर्ज मोफत न भरल्यास बसू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:34 AM2017-08-23T00:34:04+5:302017-08-23T00:34:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : शेतकºयांच्या द्यावयाच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. मात्र यासाठी पैसे आकारले जात ...

The application can not be settled if it is not paid for free | अर्ज मोफत न भरल्यास बसू देणार नाही

अर्ज मोफत न भरल्यास बसू देणार नाही

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : शेतकºयांच्या द्यावयाच्या कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. मात्र यासाठी पैसे आकारले जात असून, याचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज मोफत न भरून दिल्यास खुर्चीवर बसू दिले जाणार नाही, असा इशारा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हा उपसंघटक संभाजी पाटील यांनी दिला तर येथील आपले सरकार सेवा केंद्र, शाहू सुविधा केंद्र तसेच तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
शासनाने शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर पुन्हा आॅनलाईन अर्ज भरण्यास सांगितले आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण शासनाने शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतर पुन्हा आॅनलाईन अर्ज भरण्यास सांगितले आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या शेतकºयांना दिवसेंदिवस आजरा येथे येवून बसावे लागत आहे तर तांत्रिक बाबींमुळे दिवसभरात केवळ २० अर्ज भरून होत असल्याने शेतकºयांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
सर्व्हर डाऊनचा प्रश्न कायम असल्याने संबंधित केंद्रांकडून शेतकºयांना आज या, उद्या या अशा तारखा दिल्या जात आहेत. शेतकºयांचा वेळ व पैसा खर्च होत असल्याचे प्रा. शिंत्रे यांनी स्पष्ट केले.
यावेळी युवासेना अध्यक्ष युवराज पोवार, संभाजी पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी नायब तहसीलदार सुरेश मुंडे यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या तर आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणी पैसे मागितले तर तत्काळ तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्या, आम्ही कारवाई करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी शिवसेनेचे आजरा शहरप्रमुख विजय थोरवत, उत्तूर शहरप्रमुख मारुती हत्तरगी, संजय येसादे, जयसिंग पाटील, शैलेश पाटील, प्रकाश सासूलकर, विजय डोणकर, हणमंत पाटील, नारायण कांबळे, शिवाजी आडाव, सागर वाघरे, दिनेश कांबळे, दिनकर गिलबिले आदी उपस्थित होते.

Read in English

Web Title: The application can not be settled if it is not paid for free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.