Gokul Milk Election -केरबा भाऊ, रामराजे, बाबा देसाईंनी दाखल केले अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 07:18 PM2021-03-26T19:18:47+5:302021-03-26T19:23:12+5:30
Gokul Milk Election kolhapur- गोकुळच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी विद्यमान संचालक रामराजे कुपेकर, बाबा देसाई यांच्यासह शेकापचे ज्येष्ठ नेते केरबा भाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील आदी सात जणांनी अकरा उमेदवारी अर्ज दाखल केले, तर हमीदवाडा साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र संजय मंडलिक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी सदस्य बाबासाहेब देवकर, सदाशिव चरापले, ॲड. सुरेश कुराडे, विष्णुपंत केसरकर, अरुण इंगवले यांनी उमेदवारी अर्ज नेले.
कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी विद्यमान संचालक रामराजे कुपेकर, बाबा देसाई यांच्यासह शेकापचे ज्येष्ठ नेते केरबा भाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील आदी सात जणांनी अकरा उमेदवारी अर्ज दाखल केले, तर हमीदवाडा साखर कारखान्याचे संचालक वीरेंद्र संजय मंडलिक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी सदस्य बाबासाहेब देवकर, सदाशिव चरापले, ॲड. सुरेश कुराडे, विष्णुपंत केसरकर, अरुण इंगवले यांनी उमेदवारी अर्ज नेले.
गोकुळसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, ७६ जणाांनी २६० अर्ज नेले, तर सात जणांनी १२ अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी ६७ जणांनी २२५ अर्ज नेले आहेत. यामध्ये कुंभीचे संचालक प्रकाश पाटील, वसंत नंदनवाडे, बाबासाहेब देवकर, अजित पाटील-परितेकर, सदाशिव चरापले, विशाल गोपाळ पाटील, ॲड. सुरेश कुराडे, वीरेंद्र मंडलिक, बाजीराव सदाशिव पाटील, विष्णुपंत केसरकर, विद्याधर गुरबे, प्रतापसिंह पाटील-कावणेकर, किरणसिंह पाटील, अरुण इंगवले, नंदकुमार ढेंगे, फिरोज खान पाटील, सुहासिनी प्रवीणसिंह पाटील, मंजूषादेवी रणजितसिंह पाटील, सागर धुंदरे, सतीश पाटील, अभिजित तायशेटे, युवराज पाटील यांच्यासह कुंभीचे संचालक किशोर पाटील यांच्या पत्नी अस्मिता पाटील यांनी अर्ज नेले आहेत.
शनिवारीपासून तीन दिवस शासकीय सुटी आहे. त्यामुळे आता अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (दि. ३०) इच्छुकांची झुंबड उडणार आहे. त्यानुसार निवडणूक यंत्रणेने तयारी केली आहे.