रिक्षाचालकांसाठी ‘अभय योजना’ राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:05 PM2017-09-20T19:05:31+5:302017-09-20T19:06:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पूर्वीप्रमाणेच पासिंग नियम जाहीर करून रिक्षा पासिंग करावे. यासह पासिंगच्या दंडाबाबत
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : पूर्वीप्रमाणेच पासिंग नियम जाहीर करून रिक्षा पासिंग करावे. यासह पासिंगच्या दंडाबाबत ‘अभय योजना’ राबवावी, अशी मागणी ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटनेच्यावतीने बुधवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सद्य:स्थितीत रिक्षा व्यावसायिक अडचणीत आला आहे. पासिंगचे नियमांची स्पष्टता नसल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड मोजावा लागत आहे. किरकोळ कारणावरूनही पासिंग फेटाळले जाते. मुदतबा' रिक्षा पासिंगसाठी दिवसाला ५० रुपये इतका दंड आकारला जात आहे. आजअखेर पासिंग नसलेल्या रिक्षाचालकांना एकूण २० हजारांहून अधिकचा फटका बसत आहे. याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने चार महिन्यांसाठी दंड माफ करण्यासाठी अभय योजना आणावी.
यासह प्रवाशांच्या सोईसाठी आर.टी.ए. अंतर्गत नवीन रिक्षास्टॉप मंजूर करावेत. या नव्या स्टॉपमध्ये सीपीआर रुग्णालय गेट, करवीर पोलीस स्टेशन गेट, शेअर ए रिक्षांसाठी शिवाजी पुतळा ते सुभाषनगर, राजारामपुरी ८ वी गल्ली, अॅपल सरस्वती हॉस्पिटलसमोर, हॉकी स्टेडियम, भक्तिपूजानगर, मंगळवार पेठ, रिलायन्स मॉल, लक्ष्मीपुरी, डी मार्ट, रंकाळा चौपाटी, दसरा चौक, पापाची तिकटी यांचा समावेश करावा, असे निवेदन डॉ. पवार यांना संघटनेतर्फे दिले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष शंकरलाल पंडित, जानू घुरके, राजू नदाफ, आरिफ गारदी, शिवाजी सूर्यवंशी, अरुण शिंदे, संजय बिडकर, संजय जाधव, उमर शेख, अर्जुन दावणे, महादेव गायकवाड, बाळू कांबळे, शशिकांत निकम, अमोल म्हैदरकर आदी उपस्थित होते.