दुग्ध व्यवसायातील कर्मचाऱ्यांना ईएसआयसी विमा लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:23 AM2021-02-12T04:23:48+5:302021-02-12T04:23:48+5:30
भोगावती : दुग्ध व्यवसाय व तत्सम व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी राज्य बिमा निगम (ईएसआयसी) ही विमा योजना लागू ...
भोगावती : दुग्ध व्यवसाय व तत्सम व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी राज्य बिमा निगम (ईएसआयसी) ही विमा योजना लागू करावी व या योजनेसाठी दहा कर्मचारी या उद्योगात असावेत ही अट रद्द करावी, या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांंना संघटना शिष्टमंडळाच्या गोकुळ दूध संघाचे संचालक अरुण डोंगळे यांच्यावतीने देण्यात आले.
यावेळी या कामाचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून आपल्याला पूर्णतः सहकार्य करू, असे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व गोकुळ दूध संघाचे संचालक अरुणकुमार डोंगळे यांनी केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष के. डी. पाटील, उपाध्यक्ष शामराव पाटील, युवा नेते अभिषेक डोंगळे, जनरल सेक्रेटरी विश्वास पाटील, खजानिस सुरेश जाधव, सदस्य भैरू तानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळी
दुग्ध व्यवसायातील संबंधित कर्मचाऱ्यांना विमा योजना लागू करावी, या मागणीचे निवेदन गोकुळ दूध संघाचे संचालक अरुण डोंगळे यांच्या वतीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आले. यावेळी केरबा पाटील अभिषेक डोंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.