शिक्षक, कर्मचाऱ्यांना ‘जुनी पेन्शन’ लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:29 AM2021-09-06T04:29:23+5:302021-09-06T04:29:23+5:30
कोल्हापूर : विनाअनुदानित, अंशतः अनुदानावर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त आणि त्यानंतर शासनाने शंभर टक्के अनुदान दिलेल्या शिक्षक, ...
कोल्हापूर : विनाअनुदानित, अंशतः अनुदानावर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त आणि त्यानंतर शासनाने शंभर टक्के अनुदान दिलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन १९८२ ची पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. त्याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगावकर यांना दिले.
या शिक्षक, कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी अधिनियम १९७७ आणि नियमावली १९८१ प्रमाणे दरमहा वेतन, महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढी, वरिष्ठ वेतनश्रेणी, वेतन आयोग हे सर्व लाभ दिले जातात. मात्र, फक्त १९८२ च्या पेन्शन नियमावलीप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पेन्शनपासून वंचित ठेवले जात आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे विनाअनुदानावर केलेल्या सेवेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना जूनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी तातडीचे प्रयत्न व्हावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या शिष्टमंडळात राज्य शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, श्रीकांत पाटील, अजित रणदिवे, इरफान अन्सारी, जितेंद्र म्हैशाळे, सुरेश उगारे, माजिद पटेल, पी. जी. पोवार, दीपक पाटील, पोपट पाटील, एम. जी. पाटील उपस्थित होते.
फोटो (०५०९२०२१-कोल-मुख्याध्यापक संघ) : कोल्हापुरात शुक्रवारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यामागणीचे निवेदन बाबा पाटील, सुरेश संकपाळ आणि दत्ता पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले. यावेळी शेजारी मुख्याध्यापक संघाचे अन्य पदाधिकारी, संचालक उपस्थित होते.
050921\05kol_8_05092021_5.jpg
फोटो (०५०९२०२१-कोल-मुख्याध्यापक संघ) :कोल्हापुरात शुक्रवारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यामागणीचे निवेदन बाबा पाटील, सुरेश संकपाळ आणि दत्ता पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले. यावेळी शेजारी मुख्याध्यापक संघाचे अन्य पदाधिकारी, संचालक उपस्थित होते.