सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:27 AM2021-08-23T04:27:35+5:302021-08-23T04:27:35+5:30

यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख बलकवडे यांनी त्यांना धीर देत खून प्रकारचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दहा पथके नियुक्त केली आहेत. ...

Appoint Ujjwal Nikam as Public Prosecutor | सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा

सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा

googlenewsNext

यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख बलकवडे यांनी त्यांना धीर देत खून प्रकारचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दहा पथके नियुक्त केली आहेत. त्यांचे काम वेगाने सुरू आहे. आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक आणि योग्य मार्गाने तपास सुरू आहे. आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी आवश्यक ते पुरावे गोळा करण्यासाठी कुटुंबीयांनीही तपास कार्यात योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन केले.

दरम्यान, पोलीस अधीक्षक बलकवडे आणि तिरुपती काकडे यांनी मुरगूड पोलीस स्टेशनला भेट दिली. घटनेच्या तपास कामी महत्त्वाच्या सूचना दिल्या. रविवारी दिवसभर सोनाळी गावामध्ये सपोनि विकास बडवे, स्वप्निल मोरे विविध माध्यमातून तपास करत होते. साक्षीदारांचे जबाब पोलीस स्टेशनमध्ये सहा पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार खाडे हे घेत होते.

चौकट

खुनाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

गुन्हा उघडकीस येऊन तीन दिवस झाले. आरोपीने गुन्हा कबूल केला आहे, पण यामध्ये अजून कोणी आरोपी आहेत काय शिवाय या गुन्ह्यातील सबळ पुरावे मिळवण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वरदच्या खुनाचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. वरदचे कुटुंबीय अजूनही अंधश्रद्धेतून खून झाल्याच्या मतावर अजूनही ठाम आहेत, पण पोलीस मात्र सर्व बाजूंनी आपला तपास करत आहेत. एक दोन दिवसात पोलीस खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असा अंदाज आहे.

फोटो ओळ :- सोनाळी येथील मृत वरद पाटील यांच्या घरी जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी सपोनि विकास बडवे, स्वप्निल मोरे उपस्थित होते.

२२ सोनाळी बलकवडे

Web Title: Appoint Ujjwal Nikam as Public Prosecutor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.