आठ दिवसांत ६0 परिचारिकांना नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 04:05 PM2020-02-06T16:05:11+5:302020-02-06T16:07:33+5:30
चार जिल्ह्यातील ६0 अस्थायी परिचारिक ांची नियुक्तीची प्रक्रिया वर्षापासून रखडल्या आहेत. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्यावतीने तातडीने नियुक्त्या करा, अन्यथा खुर्च्या कार्यालयाबाहेर टाकू, असा इशारा दिला होता. यावर आठ दिवसांत नियुक्ती देऊ, अशी लेखी हमी दिली.
कोल्हापूर : चार जिल्ह्यातील ६0 अस्थायी परिचारिक ांची नियुक्तीची प्रक्रिया वर्षापासून रखडल्या आहेत. महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्यावतीने तातडीने नियुक्त्या करा, अन्यथा खुर्च्या कार्यालयाबाहेर टाकू, असा इशारा दिला होता. यावर वैद्यकिय उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे यांनी आठ दिवसांत नियुक्ती देऊ, अशी लेखी हमी दिली. १२ फेब्रुवारीपर्र्यत नियुक्ती झाल्या नाहीत तर चेखलफेक आंदोलन करु, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला.
अस्थायी परिचारिका नियुक्ती झालेल्या नसल्यामुळे या पदासाठी पात्र असणाऱ्या गरजू आणि होतकरुना फटका बसत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते नियुक्तीसाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत.
वैद्यकिय उपसंचालकांकडे लातूर आणि कोल्हापूर कार्यालयाचा पदभार असल्यामुळे येथील कामकाजावर परिणाम होत आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत परिचारकांना नियुक्ती देण्यात याव्यात. त्यांची सहा महिन्याची कालमर्यादा आकरा महिन्यांची करावी.
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या चारही जिल्ह्यातील डॉक्टर, परिचारिका, परिचारक जागांची तात्कळ भरती करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी मनसेचे संजय शामराव पाटील, नयन गायकवाड, रमेश मेनकर, विशाल मोरे, दीपक पाटील, सौरभ मोरे, लखन लादे उपस्थित होते.