‘शेतकरी अपघात’ याेजनेसाठी एजन्सींची नेमणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:23 AM2021-04-17T04:23:17+5:302021-04-17T04:23:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने दोन एजन्सींची नेमणूक केली ...

Appointment of agencies for 'Farmers Accident' scheme | ‘शेतकरी अपघात’ याेजनेसाठी एजन्सींची नेमणूक

‘शेतकरी अपघात’ याेजनेसाठी एजन्सींची नेमणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने दोन एजन्सींची नेमणूक केली आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेती करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे, आदी नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात, त्याचबरोबर रस्त्यावरील व वाहन अपघातामध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आहे. ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ या कालवधीसाठी युनिव्हर्सल सॉपी जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत, तर ऑक्झिमलियम इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि. नवी मुंबई या विमा सल्लागार कंपनीमार्फत संपूर्ण राज्यात ही योजना राबविण्यात येत आहे. कुटुंबातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील आई, वडील, शेतकऱ्याचा पती अथवा पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती.

अशी मिळणार नुकसानभरपाई

अपघाती मृत्यू - दोन लाख रुपये

अपघातात एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास - दोन लाख रुपये

अपघातात दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास - दोन लाख रुपये

ही लागणार कागदपत्रे -

विहीत नमुन्यातील पूर्वसूचना अर्ज

७/१२ उतारा, वयाचा दाखला, मृत्यू दाखला, पोलीसपाटील अहवाल, घटनास्थळ पंचनामा.

शवविच्छेदन अहवाल, अपंगत्व आले असलेस प्रमाणपत्र.

अपघात घटनेच्या स्वरूपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाच्या प्रपत्र क मधील कागदपत्रे.

यांना लाभ मिळणार नाही

विमा कालावधी पूर्वीची अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, जाणीवपूर्वक स्वत:ला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, नैसर्गिक मृत्यू, शरीरांतर्गत रक्तस्राव.

कृषी पर्यवेक्षकाकडे प्रस्ताव सादर करावा

स्थानिक पातळीवर कृषी पर्यवेक्षक हे सादरकर्ता अधिकारी आहेत. त्यांच्या माध्यमातून परिपूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवायचा असतो. अपघातानंतर ४५ दिवसांच्या आत दावा नोंदविणेत यावा.

कोट -

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत सरपंच, तलाठी, पाेलीस पाटील यांनी यामध्ये पात्र असणाऱ्या शेतकरी अथवा त्यांच्या कुटुंबांना माहिती द्यावी. लाभार्थ्यांनी कृषी सहायकांच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवावा.

- ज्ञानदेव वाकुरे,(जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)

Web Title: Appointment of agencies for 'Farmers Accident' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.