विधान परिषद निवडणुकीनंतरच ‘स्वीकृत’ संचालक नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:37+5:302021-05-29T04:18:37+5:30

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) स्वीकृत संचालक पदासाठी डझनभर इच्छुक ...

Appointment of ‘approved’ directors only after the Legislative Council elections | विधान परिषद निवडणुकीनंतरच ‘स्वीकृत’ संचालक नियुक्ती

विधान परिषद निवडणुकीनंतरच ‘स्वीकृत’ संचालक नियुक्ती

Next

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) स्वीकृत संचालक पदासाठी डझनभर इच्छुक आहेत. दोन जागा असल्याने नियुक्ती करताना नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. त्यात तोंडावर विधान परिषद निवडणूक असल्याने आताच निवडी करुन नाराजी ओढवून घेणे, परवडणारे नसल्याने या निवडणुकीनंतरच ‘स्वीकृत’च्या नियुक्त्या होणार हे निश्चित आहे.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत विरोधी आघाडीची मोट बांधत पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्तांतर घडवले. विरोधी आघाडीमध्ये २१ नेते आणि २१ जागा होत्या. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन पॅनेल बांधणी करताना मंत्री पाटील यांना कसरत करावी लागली होती. नेत्यांची नाराजी दूर करत सत्तांतराच्या दिशेने वाटचाल करताना अनेक तडजोडी कराव्या लागल्या. आता सत्ता आल्यानंतर स्वीकृत संचालक पदासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे.

‘गोकुळ’च्या संचालक मंडळात दोन स्वीकृत व एक शासन नियुक्त प्रतिनिधी असे तीन प्रतिनिधी निवडता येतात. मागील संचालक मंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई व रामराजे कुपेकर हे दोघे स्वीकृत संचालक होते. ‘गोकुळ’ची निवडणूक झाल्यानंतर लगेचच देसाई व कुपेकर यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून शिरोळचे अनिल यादव यांना संधी देण्यात आली.

आता, स्वीकृतसाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शासन नियुक्त प्रतिनिधीची नियुक्ती करणे अवघड नाही. कॉग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. स्वीकृतच्या दोन जागा दोन्ही कॉंग्रेस तर शासन नियुक्त शिवसेनेला देण्यावर विचार सुरु आहे. मात्र हे सगळे करताना नाराजांची संख्याही वाढू शकते, त्यात स्वीकृत पदाच्या आशेवर अनेकांना सोबत ठेवता येऊ शकते. विरोधी आघाडीतील विरेंद्र मंडलीक, विद्याधर गुरबे, महाबळेश्वर चौगले व सुष्मिता पाटील हे पराभूत झाले आहेत. त्याशिवाय ‘गोकुळ’ बचाव मंचमधील इच्छुकांना थांबवले आहे. त्याशिवाय इतरही इच्छुक आहेत. संधी देताना नाराजी वाढणार हे निश्चित आहे. विधानपरिषद निवडणुकीला आठ-नऊ महिने राहिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर नाराजी ओढवून घेणे परवडणारे नसल्याने नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

गडहिंग्लज विभागाला संधी मिळणार

‘गोकुळ’च्या संचालक मंडळात गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील प्रतिनिधी नाही. दोन तालुक्यातील सहाही उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे स्वीकृतमधील एक जागा येथे दिली जाणार हे निश्चित आहे. उर्वरित एक जागेबाबत शिरोळ, करवीर, राधानगरीचा विचार होऊ शकतो.

‘गोकुळ’मध्येच विधानपरिषदेची पेरणी

‘गोकुळ’च्या निवडणूुकीत मंत्री सतेज पाटील यांनी जानेवारी २०२२ मध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची पेरणी केली. त्यानुसारच पॅनेलची बांधणी करत असताना काही ठिकाणी आपण दोन पावले मागे येण्याची भूमिकाही त्यांनी घेतली.

Web Title: Appointment of ‘approved’ directors only after the Legislative Council elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.