हर्षवर्धन मोहिते यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:21 AM2021-04-12T04:21:26+5:302021-04-12T04:21:26+5:30

आयबीपीएस अंतर्गत घेण्यात आलेल्या देशपातळीवरील परीक्षेत हर्षवर्धन यांनी गुणानुक्रमे यश संपादन केले. या पदासाठी ऑगस्ट २०२९ मध्ये पूर्व ...

Appointment of Harshvardhan Mohite | हर्षवर्धन मोहिते यांची नियुक्ती

हर्षवर्धन मोहिते यांची नियुक्ती

Next

आयबीपीएस अंतर्गत घेण्यात आलेल्या देशपातळीवरील परीक्षेत हर्षवर्धन यांनी गुणानुक्रमे यश संपादन केले. या पदासाठी ऑगस्ट २०२९ मध्ये पूर्व परीक्षा, तर नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्य परीक्षा आणि डिसेंबर २०२० मध्ये कौशल्य चाचणी घेण्यात आली होती. हर्षवर्धन हे शेतकरी कुटुंबातील असून अभियांत्रिकीची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाबरोबरच त्यांनी गेल्या दोन वर्षात शेतीमध्ये आधुनिक शेती प्रयोग राबवून प्रगतशील शेतकरी बनण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

फोटो (११०४२०२१-कोल-हर्षवर्धन मोहिते (वडणगे)

आर्या कुलकर्णी यांचे यश

कोल्हापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिसेंबर २०२० मध्ये घेतलेल्या महाराष्ट्र राज्य सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षेत कोल्हापुरातील आर्या सुनील कुलकर्णी या समाजशास्त्र विषयात उत्तीर्ण झाल्या आहेत. आर्या या सध्या कसबा बीड (ता. करवीर) येथील श्री सद्गुरू शिक्षण संस्था संचलित आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महिला महाविद्यालयात समाजशास्त्र विभागात ( वरिष्ठ) कार्यरत आहेत. त्यांना प्रा. व्ही. एन. मेणसे, प्राचार्या डॉ. मंजूश्री पवार, डॉ. अर्जुन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. आर्या यांना शिवाजी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात एम. ए. समाजशास्त्र परीक्षेत प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.

फोटो (११०४२०२१-कोल-आर्या कुलकर्णी (सेट)

===Photopath===

110421\11kol_1_11042021_5.jpg~110421\11kol_2_11042021_5.jpg

===Caption===

फोटो (११०४२०२१-कोल-हर्षवर्धन मोहिते (वडणगे)फोटो (११०४२०२१-कोल-आर्या कुलकर्णी (सेट)~फोटो (११०४२०२१-कोल-हर्षवर्धन मोहिते (वडणगे)फोटो (११०४२०२१-कोल-आर्या कुलकर्णी (सेट)

Web Title: Appointment of Harshvardhan Mohite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.