१३ वारसांना महापालिकेत नोकरीचे नियुक्तीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:28 AM2021-08-24T04:28:53+5:302021-08-24T04:28:53+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या सेवेत असताना मयत झालेल्या १३ कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, ...

Appointment letter to 13 heirs | १३ वारसांना महापालिकेत नोकरीचे नियुक्तीपत्र

१३ वारसांना महापालिकेत नोकरीचे नियुक्तीपत्र

Next

कोल्हापूर : महापालिकेच्या सेवेत असताना मयत झालेल्या १३ कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत जाधव, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी छोटा कार्यक्रम झाला.

महापालिकेच्या मंजूर आस्थापनेवरील रिक्त कनिष्ठ लिपिक, मुकादम तथा लिपिक व पहारेकरी या पदावर पात्र वारसदार श्वेता शिंदे, संकेत शिंदे, शुभम जिरंगे, शुशांत कांबळे, रोहित जाधव, सौरभ तावडे, बालमुकुंद पाटील, चंद्रकांत बुचडे, सुनील करडे, वर्षा भंडारे, दत्ता डवरे, शिवाजी पाटील, श्रीधर कांबळे यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पोवार, प्रभारी प्रशासक तथा अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, कामगार अधिकारी सुधाकर चलावाड, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी गटनेता शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक सचिन पाटील, अदिल फरास, विनायक फाळके आदी उपस्थित होते.

फोटो : २३०८२०२१- कोल- नियुक्तीपत्र

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते १३ वारसांना महापालिकेत विविध पदांवर नियुक्तीपत्रे देण्यात आली.

Web Title: Appointment letter to 13 heirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.