जिल्हा बँकेच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नियुक्ती पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:22+5:302021-06-29T04:17:22+5:30

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपाअंतर्गत नोकरीचे नियुक्ती पत्रे व विमा धनादेशाचे वाटत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन ...

Appointment letters to the heirs of the deceased employees of the District Bank | जिल्हा बँकेच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नियुक्ती पत्रे

जिल्हा बँकेच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना नियुक्ती पत्रे

Next

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपाअंतर्गत नोकरीचे नियुक्ती पत्रे व विमा धनादेशाचे वाटत बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या जागतिक महाभयानक महामारीतही बँकेने ग्राहकांना तत्पर सेवा अखंडपणे दिली. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांनी ग्राहकसेवा केली आहे. मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी बँक हिमालयासारखी उभी आहे.

सुमय्या मुनीरअहमद बाणदार(जयसिंगपूर), ओंकार कनेरकर (सातवे) या वारसदारांना धनादेशांचे वाटप झाले. तसेच तुषार तुकाराम पाटील (असंडोली), पूजा शीतल उपाध्ये (उमळवाड), सौरभ आबाजी एकशिंगे (केनवडे), धनराज माधवराव रणनवरे (कडगाव), अभिजित कुमार पाटील (जयसिंगपूर), शाहरुख याकूब नदाफ (कसबा सांगाव), ओंकार भीमराव कनेरकर (सातवे) व सुमय्या मुनीरअहमद बाणदार (जयसिंगपूर) या वारसदारांना अनुकंपाअंतर्गत बँकेच्या नोकरीच्या नियुक्ती पत्रांचेही वितरणही करण्यात आले.

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, निवेदिता माने, पी. एन. पाटील, राजेश पाटील, राजू आवळे, अनिल पाटील, विलास गाताडे, आर. के. पोवार, पी. जी. शिंदे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, अशोक चराटी, भैय्या माने, असिफ फरास, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अर्चना पाटील, रणजितसिंह पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.

फोटो ओळी : जिल्हा बँकेच्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा नोकरीच्या नियुक्तीचे पत्र व विमा रक्कम धनादेशाचे वाटप बँकेचे अध्यक्ष, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संचालक मंडळ उपस्थित होते. (फोटो-२८०६२०२१-कोल-केडीसीसी)

Web Title: Appointment letters to the heirs of the deceased employees of the District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.