कोरोना रोखण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती -जिल्हाधिकारी दौलत देसाई : तालुका-गावनिहाय नियोजनाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:22 AM2021-03-06T04:22:00+5:302021-03-06T04:22:00+5:30
कोल्हापूर : कोविड संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी व कोविन ॲपमध्ये नोंदणी व ज्येष्ठ-व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण ...
कोल्हापूर : कोविड संसर्गाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी व कोविन ॲपमध्ये नोंदणी व ज्येष्ठ-व्याधीग्रस्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.
या अधिकाऱ्यांवर त्या त्या भागातील नागरिकांकडून साेशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जाते की नाही, याची पडताळणी करुन ते बंधनकारक करणे, लसीकरणाचा गावनिहाय
आराखडा करुन सेंटरची पाहणी करणे , येथील कामकाज व जबाबदाऱ्या या विषयी माहिती घेऊन व्यवस्थापन, कोविन ॲपमध्ये ज्येष्ठ व व्याधीग्रस्त नागरिकांची ऑनलाईन नोंदणी आणि वेळ निश्चितीबाबत नियोजन या नागरिकांची आकडेवारी व यादी तयार करणे, ग्रामस्तरीय कर्मचारी , आरोग्य कर्मचारी , आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी यांच्यामार्फत लाभार्थी यांचे नियोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण , नोंदणी नसल्यास नवीन नोंदणी करून लसीकरण करणेबाबतचे नियोजन व नागरिकांचे प्रबोधन करण्याचे काम अधिकाऱ्यांकडून केले जाणार आहे.
---
विभाग : अधिकाऱ्याचे नाव
करवीर : वैभव नावडकर,उपविभागीय अधिकारी ,पन्हाळा : अमित माळी, पन्हाळा नगरपरिषद : स्वरूप खारगे, शाहूवाडी : अरूण जाधव, मलकापूर नगरपालिका : स्वरूप खारगे,
हातकणंगले : विकास खरात, हुपरी नगरपंचायत : स्नेहलता कुंभार, वडगांव नगरपालिका- टिना गवळी, इचलकरंजी नगरपालिका : शरद पाटील, शिरोळ : किरण लोहार, शिरोळ नगरपंचायत : तैमुर मुलाणी, जयसिंगपूर नगरपालिका : टिना गवळी, कुरुंदवाड नगरपरिषद: निखिल जाधव, कागल : रामहरी भोसले, राधानगरी -कागल : पंडित पाटील, मुरगुड नगरपालिका : संजय गायकवाड, आजरा : सोमनाथ रसाळ, आजरा नगरपंचायत: अजिंक्य पाटील, गडहिंग्लज : विजया पांगारकर, गडहिंग्लज नगरपालिका : नागेंद्र मुतकेकर, चंदगड : चंद्रकांत सूर्यवंशी, भुदरगड : डॉ. संपत खिलारी, गगनबावडा : दीपक घाटे, राधानगरी : प्रसेनजित प्रधान.
---