खासगी रुग्णालयावर नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:25 AM2021-04-09T04:25:08+5:302021-04-09T04:25:08+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून शहरात कोरोनाबाधित रुग्णांना खाजगी रुग्णालयात बेड मिळावे, त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत याकरिता ...
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून शहरात कोरोनाबाधित रुग्णांना खाजगी रुग्णालयात बेड मिळावे, त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत याकरिता महानगरपालिका प्रशासनाने गुरुवारी १९ संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली, तर या संपर्क अधिकाऱ्यांवर व खाजगी रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी उप-आयुक्त, सहायक आयुक्त व पर्यावरण अभियंता अशा सात नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्त केलेली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात तसेच शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णांची संख्या वाढली तर खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार मिळावेत म्हणून हे संपर्क व नियंत्रण अधिकारी नियुक्त केले आहेत.
संपर्क अधिकारी -
- जानकी नर्सिंग होम व सिटी हॉस्पिटल - अधीक्षक तेजश्री शिंदे
श्री साई कार्डी ॲक सेंटर व मोरया हॉस्पिटल - वरिष्ठ लेखापरीक्षक दीपक कुंभार
- सचिन सुपर स्पेशालिटी व सिद्धिविनायक कॉनकोर्डन्स हॉस्पिटल - सहा. अधीक्षक बळवंत सूर्यवंशी
- सिद्धिविनायक हार्ट हॉस्पिटल व ॲस्टर आधार हॉस्पिटल - सहा. अधीक्षक श्रीमती प्राजक्ता चौगुले
- मंगलमूर्ती हॉस्पिटल व व्यंकटेश्वरा हॉस्पिटल- कनिष्ठ लिपिक अवधूत पलंगे
- केपीसी हॉस्पिटल, सरस्वती मेडिसिटी व सूर्या हॉस्पिटल - आस्थापना अधीक्षक सागर कांबळे
- मेट्रो हॉस्पिटल व विंन्स - अधीक्षक विलास साळोखे
- डायमंड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व अंतरंग हॉस्पिटल - कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील
- कृपलानी हॉस्पिटल, रत्ना मेडिकेअर सेंटर व केळवकर हॉस्पिटल - कनिष्ठ अभियंता उमेश बागूल
- कुकरेजा नर्सिंग होम व ट्युलिप हॉस्पिटल - कनिष्ठ अभियंता मीरा नगिमे
- ॲपेक्स हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल व सनराइज हॉस्पिटल - वरिष्ठ लिपिक विजय वणकुद्रे
- कोल्हापूर ऑर्थोपेडिक इन्स्टिट्यूट व ॲपल सरस्वती हॉस्पिटल - कनिष्ठ अभियंता सुरेश पी. पाटील
- पल्स हॉस्पिटल व निरामय हॉस्पिटल - सहायक सांख्यिकी अधिकारी संजय कुंभार
- डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज व अथायू हॉस्पिटल - लेखापाल बाबा साळोखे
- विजय हॉस्पिटल व साई नर्सिंग होम - नगरसचिव सुनील बिद्रे
- वालावलकर हॉस्पिटल, नॉर्थस्टार हॉस्पिटल व नारायणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल - प्रताप माने
- कृष्णा हॉस्पिटल व श्री हॉस्पिटल, विमल मेडिकल - वरिष्ठ लिपिक प्रदीप व्हरांबळे
- कपिलेश्वर नर्सिंग होम व गंगाप्रकाश हॉस्पिटल - वरिष्ठ लिपिक सागर सारंग
- दत्तसाई हॉस्पिटल, श्रावस्ती हॉस्पिटल व सद्गुरू मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल - वरिष्ठ लिपिक सागर सुतार
नियंत्रण अधिकारी -
तर उप-आयुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, पर्यावरण अधिकारी समीर व्याग्रांबरे यांच्यावर नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे.