गडहिंग्लज पंचायत समितीच्या कामाचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:45 AM2021-02-06T04:45:00+5:302021-02-06T04:45:00+5:30

गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीने यशवंत पंचायतराज अभियानासाठी सहभाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ४) मूल्यांकन कमिटीने पंचायत ...

Appreciate the work of Gadhinglaj Panchayat Samiti | गडहिंग्लज पंचायत समितीच्या कामाचे कौतुक

गडहिंग्लज पंचायत समितीच्या कामाचे कौतुक

Next

गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीने यशवंत पंचायतराज अभियानासाठी सहभाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ४) मूल्यांकन कमिटीने पंचायत समितीला भेट देऊन उपक्रमांची आणि विभागांची माहिती घेतली. कमिटीने राबविलेले उपक्रम आणि कामाचे कौतुक केले.

कमिटीतर्फे सामान्य प्रशासन, महिला बालकल्याण, बांधकाम, कृषी, आरोग्य, पाणीपुरवठा, जिल्हा ग्रामीण विकास, स्वच्छ भारत मिशन, शालेय शिक्षण, समाजकल्याण, सिंचन, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, मनरेगा विभागांची माहिती घेण्यात आली. विभागांनी राबविलेले उपक्रम आणि आदर्श कामांची दखल घेऊन मूल्यांकन करण्यात आले.

कमिटीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भरत शेंडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. घुले, कक्षाधिकारी धनंजय खटावकर, शैलेश सराफ, साहाय्यक लेखाधिकारी प्रशांत सुतार, कनिष्ठ साहाय्यक दिनेश कर्वे, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आदींचा समावेश होता.

याप्रसंगी कमिटीतर्फे मार्गदर्शन करण्यात आले. पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. सभापती रूपाली कांबळे, गटविकास अधिकारी शरद मगर यांनी कमिटीचे स्वागत केले.

यावेळी उपसभापती इराप्पा हसुरी, साहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर, आदींसह पदाधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते.

Web Title: Appreciate the work of Gadhinglaj Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.