नव्या २६ विंधन विहिरींना मंजुरी, करवीर, राधानगरी, कागलचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:15 AM2019-04-27T11:15:46+5:302019-04-27T11:22:52+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गाव व वाड्यांमधील नव्याने २६ विंधन विहिंरीना मंजुरी देण्यात आली आहे. यात करवीर, राधानगरी व कागल तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गाव व वाड्यांमधील नव्याने २६ विंधन विहिंरीना मंजुरी देण्यात आली आहे. यात करवीर, राधानगरी व कागल तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.
करवीर तालुक्यातील धोंडेवाडी व नंदगावपैकी नाळवा, राधानगरीतील मलगुंडेवाडा, म्हासुर्ली-जोगमवाडी, म्हासुर्ली-सावंतवाडी, राजापूर-भिवाची खोळ, राजापूर-सोकमारीचा धनगरवाडा, पडळी-दळवेवाडी, कारिवडे- राणोशीवाडी, कारिवडे- राऊतवाडी, धामणवाडी, धामणवाडी-हणबरवाडी, पडसाळी-वाणेवाडी -शेटेवाडी, मौ. कासारपवाडा-धनगरवाडा, पडळी-डिंगेवाडी, पडळी-जोंधळेवाडी, पाल बुद्रुक, नागदेववाडी, पाल बुद्रुक, स्मशानभूमी वसाहत, पाल खुर्द, हसणे-मांढरेवाडी, केळोशी बुद्रुक, शिंदेवाडी, दुर्गमानवाड-नाना पाटील वाडी या २० ठिकाणांच्या विंधन विहिरीचा समावेश आहे.
कागल तालुक्यातील तमनाकवाडा-दलितवस्ती, अर्जुनवाडा-माळवाडी तिठे पाणंद रोड, गलगले-वेताळ वस्ती, बोळावी-हसूर रोड या चार ठिकाणी अशा एकूण २६ विंधन विहिरीच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. स्मिता कुलकर्णी यांनी दिल्या आहेत.