‘शाहू मेडिकल’साठी ८० कोटी मंजूर

By Admin | Published: May 3, 2016 01:00 AM2016-05-03T01:00:00+5:302016-05-03T01:00:00+5:30

यापैकी ४० कोटी रुपये पावसाळी अधिवेशनात व उर्वरित ४० कोटी पुढील आर्थिक वर्षात वितरीत करण्याचे आदेश वित्तमंत्र्यांनी दिले.

Approval of Rs. 80 crore for 'Shahu Medical' | ‘शाहू मेडिकल’साठी ८० कोटी मंजूर

‘शाहू मेडिकल’साठी ८० कोटी मंजूर

googlenewsNext

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रकल्पासाठी वित्त विभागाकडून ८० कोटींचा निधी सोमवारी मंजूर करण्यात आला. त्यातील पहिल्या टप्प्यातील ४० कोटी रुपये पावसाळी अधिवेशनात मिळणार आहेत. त्यामुळे निधीअभावी महाविद्यालयाच्या रखडलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक घेऊन निधीचा प्रश्न मार्गी लावला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापुरात सन २००१ मध्ये सुरू झाले. या महाविद्यालयाचे शेंडा पार्क$ येथील ३९.२१ एकर जागेमध्ये प्रथम वर्षाचे वर्ग सुरू झाले. दुसऱ्या वर्षाच्या इमारतीसाठी आतापर्यंत १३ कोटी रुपये खर्च करून दोन इमारतींमध्ये पॅथॉलॉजी, मायक्रो बायॉलॉजी, पी. एस. एम. व औषधशास्त्र हे विभाग तयार झाले. मात्र, दुसऱ्या वर्षाचा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ८० कोटी निधीची आवश्यकता होती. सन २००९ पासून या टप्प्यासाठीचा निधी शासनदरबारी प्रलंबित होता. याबाबत सोमवारी वित्तमंत्री मुनगंटीवार यांच्यासमवेत पालकमंत्री पाटील व आमदार महाडिक यांनी बैठक घेतली. त्यात ८० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यापैकी ४० कोटी रुपये पावसाळी अधिवेशनात व उर्वरित ४० कोटी पुढील आर्थिक वर्षात वितरीत करण्याचे आदेश वित्तमंत्र्यांनी दिले.बैठकीस महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद, बांधकाम विभागाचे सचिव सी. पी. जोशी, एस. एस. साळोखे, आर. एस. पाटील, बी. एम. उगले आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत अधिष्ठाता रामानंद यांनी सांगितले की, शासनदरबारी प्रलंबित असलेल्या निधीबाबत पाठपुरावा करून तो मंजूर करण्याचे आश्वासने पालकमंत्री पाटील, आमदार महाडिक यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी वित्तमंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणून यातून निधीचा प्रश्न मार्गी लावला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महाविद्यालयातील दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती मिळणार आहे. (प्रतिनिधी)

दुसऱ्या टप्प्यात पॅथॉलॉजी व मायक्रो बायोलॉजी व्याख्यान कक्ष (१० कोटी ५९ लाख), मुलांसाठी दोन वसतिगृह (१३ कोटी ७२ लाख), मुलींसाठी दोन वसतिगृह (१३ कोटी ७२ लाख), ग्रंथालय इमारत (१३ कोटी ५१ लाख), आॅडिटोरियम हॉल (११ कोटी ६ लाख ), ओपीडी विभागाची इमारत (९ कोटी), परिचारिका वसतिगृह इमारत (१९ कोटी ७३ लाख), शल्य चिकित्साशास्त्र, अस्थी व्यंगोपचारशास्त्र व इतर विभागांच्या इमारती (३० कोटी ३२ लाख), पाच विषयांसह फॉरेन्सिक विभाग, ८६८ खाटांच्या हॉस्पिटलची इमारत, आदी कामांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश आहे.

कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित निधीबाबत मुंबईमध्ये सोमवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक आदी उपस्थित होते.
 

Web Title: Approval of Rs. 80 crore for 'Shahu Medical'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.