शिवनाकवाडी नळ पाणीपुरवठ्याच्या अंदाजपत्रकास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:24 AM2021-04-01T04:24:42+5:302021-04-01T04:24:42+5:30
जयसिंगपूर : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील नळ पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणामुळे रखडलेली होती. योजना रखडल्यामुळे योजनेवरील खर्चात वाढ झाली ...
जयसिंगपूर : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील नळ पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणामुळे रखडलेली होती. योजना रखडल्यामुळे योजनेवरील खर्चात वाढ झाली होती. या वाढीव व सुधारित योजनेसाठीच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. सुधारित अंदाजपत्रकानुसार तीन कोटी दोन लाख रुपयांच्या खर्चाची निविदा प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचेही मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा विभागाकडून या योजनेचा सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे देण्यात आला होता. याकामी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे शिवनाकवाडी नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारित योजनेस मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाच्या नियोजन व वित्त विभागाने या योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकास मान्यता दिली असल्याने शिवनाकवाडी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.