विविध १९ विषयांना मंजुरी : पालिका सभेत बहुमताने ठराव मंजूर; विरोधी नगरसेवकांकडून प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती

By admin | Published: May 26, 2015 12:33 AM2015-05-26T00:33:17+5:302015-05-26T00:47:23+5:30

विविध १९ विषयांना मंजुरी : पालिका सभेत बहुमताने ठराव मंजूर; विरोधी नगरसेवकांकडून प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती

Approval of various 19 subjects: Majority approved in the municipal council; Opposition councilors questioned the administration | विविध १९ विषयांना मंजुरी : पालिका सभेत बहुमताने ठराव मंजूर; विरोधी नगरसेवकांकडून प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती

विविध १९ विषयांना मंजुरी : पालिका सभेत बहुमताने ठराव मंजूर; विरोधी नगरसेवकांकडून प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती

Next

पेठवडगाव : वडगाव नगरपालिकेच्या सभागृहास स्व. विजयसिंह यादव यांचे नाव देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला, तर विरोधी गटाने यादव व स्व. शिवाजीराव सालपे यांचे संयुक्तपणे नाव देण्याचा ठराव मांडला. मात्र, सत्ताधारी गटाने तो धुडकावत यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, टेंडर, अपुरा पाणीपुरवठा, पाणीपुरवठा योजनेचे संथ काम, दर्जा यावर विरोधी गटाच्या नगरसेवकांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.
पालिका सभेत विषयपत्रिकेवरील दहा, तर आयत्या वेळच्या नऊ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. मुख्याधिकारी नांगेद्र मुतकेकर, उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या उपस्थितीत व नगराध्यक्षा विद्या पोळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
सोमवारच्या सभेत महालक्ष्मी मंगलधाम लिलावाने देणे, सभागृहास ‘स्व. विजयसिंह यादव सभागृह’ असे नाव देणे, व्यायामशाळेमध्ये सात लाख अनुदानातून इमारत बांधणे, लिपिक व सफाई कर्मचारी पद शासनाकडून मंजूर करून घेणे, लोकसहभागातून मोठ्या जनावरांच्या कत्तलखान्यास दुरुस्तीसाठी परवानगी देणे, दफनभूमी सभोवती दगडी संरक्षक भिंत बांधणे, तसेच गणेश मंदिर ते पन्हाळकर वसाहत या रस्त्याचे खडीकरण कामाचे टेंडर मंजूर करण्यात आले.
सभागृहास यादव यांचे नाव द्यावे, अशी मागणी विजय शहा यांच्यासह नागरिक व सत्तारूढ गटाच्या ११ नगरसेवकांनी केली होती, तर विरोधी गटाचे चार नगरसेवक व नागरिक यांनी सभागृहास स्व. शिवाजीराव सालपे यांचे नाव द्यावे, असे अर्ज विषयपत्रिकेत होते.
रंगराव पाटील यांनी, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या नेत्यांच्या नावांची मागणी केलेली आहे. एकाचे नाव दिले तर दुसऱ्या गटास बरे वाटणार नाही. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे संयुक्त नाव सभागृहास द्यावे, अशी मागणी विरोधी गटाने केली. मात्र, सत्तारूढ गटाच्या नगरसेवकांनी विरोध केला. अखेरीस यादव यांचे नाव देण्यास विरोधी गटाचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न विचारून मतदान घेण्यात आले. त्यास विरोधी चार नगरसेवकांनी हात वर करून विरोध केला, तर सत्तारूढ गटाने सालपे यांचे नाव त्यांच्या जन्मदिनी देणार असल्याचे सांगितले.
प्रश्नोत्तराच्या तासात संतोष गाताडे यांनी चिंगळे गल्लीतील रस्ता, गणेश मंदिरापाठीमागे उंचीवर गटर बांधणे, आदी प्रश्न मांडले, तर रंगराव पाटील-बावडेकर यांनी रस्त्याच्या कामाची दक्षता व नियंत्रण


प्र्रशासन निरुत्तर
विकासकामाची पाहणी करण्यासाठी नागरिक गेले असता, प्रशासन, लोकप्रतिनिधीऐवजी अन्य काहीजण दादागिरी करतात. अशी माणसे नेमली आहेत का ? असा जाब रंगराव पाटील यांनी विचारला. यावर प्रशासन निरुत्तर झाले.

Web Title: Approval of various 19 subjects: Majority approved in the municipal council; Opposition councilors questioned the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.