पोलिसांच्या निवासस्थानाला मंजुरी देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:27 AM2021-02-16T04:27:24+5:302021-02-16T04:27:24+5:30

कोल्हापूर, : शाहूवाडीमधील पोलिसांच्या निवासस्थानाला एप्रिलमध्ये निश्चित मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही गृहराज्य मंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी सोमवारी ...

Approve the police residence | पोलिसांच्या निवासस्थानाला मंजुरी देऊ

पोलिसांच्या निवासस्थानाला मंजुरी देऊ

googlenewsNext

कोल्हापूर, : शाहूवाडीमधील पोलिसांच्या निवासस्थानाला एप्रिलमध्ये निश्चित मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही गृहराज्य मंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी सोमवारी दिली.

शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव येथे सोमवारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे, वैद्यकीय

अधिकारी निवासस्थान आणि प्राथमिक केंद्रीय शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण गृहराज्यमंत्री देसाई

आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य

सभापती हंबीरराव पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील, सरपंच

अमरसिंह पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार धैर्यशील माने, बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील, मुरलीधर जाधव, हंबीरराव पाटील यांची भाषणे झाली.

सरपंच अमरसिंह पाटील यांनी आपल्या मानधनातून लेक वाचवा लेक शिकवा अभियानांतर्गत पाच मुलींसाठी

दामदुप्पट ठेव ठेवली आहे. त्याचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती विजय खोत, जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील, डॉ. उषादेवी

कुंभार, विजय देसाई, उपसभापती दिलीप पाटील, नामदेव गिरी, भीमराव पाटील, दत्ता राणे, स्नेहा जाधव,

लता जाधव, अश्विनी जाधव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

0000000

Web Title: Approve the police residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.