दत्तच्या गाळप क्षमतेच्या विस्तारीकरणाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:53+5:302021-03-20T04:21:53+5:30

शिरोळ : कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची उपलब्धता व केंद्र शासनाचे इथेनॉल उत्पादक वाढीचे धोरण यासाठी कारखान्याची गाळप क्षमता ११ हजार ...

Approves expansion of Dutt's crushing capacity | दत्तच्या गाळप क्षमतेच्या विस्तारीकरणाला मंजुरी

दत्तच्या गाळप क्षमतेच्या विस्तारीकरणाला मंजुरी

Next

शिरोळ : कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची उपलब्धता व केंद्र शासनाचे इथेनॉल उत्पादक वाढीचे धोरण यासाठी कारखान्याची गाळप क्षमता ११ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या विस्तारीकरण व औद्योगिकीकरण प्रकल्पास श्री दत्त साखर कारखान्याच्या ऑनलाइन विशेष साधारण सभेत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष गणपतराव पाटील होते.

अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, ऊस उत्पादक व क्षारमुक्त प्रकल्पामुळे उपलब्ध होणारा ऊस विचारात घेतला, तर कारखान्याकडे दरवर्षी साडेसतरा ते अठरा लाख मेट्रिक टन इतका ऊस उपलब्ध होणार आहे. यामुळेच गाळप क्षमता प्रतिटन ९ हजारवरून ११ हजार मेट्रिक टन इतकी वाढविण्याबरोबर डिस्टिलरी व इथेनॉल उत्पादन क्षमता उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याला सभासदांनी मंजुरी द्यावी, असे आवाहन केले.

सभेचे नोटीस वाचन व वृत्तांत वाचन कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील यांनी केले. सभेपुढील सर्व विषयांना मंजुरी मिळाली. यावेळी उपाध्यक्ष श्रेणिक पाटील, अण्णासाहेब पाटील, रणजित कदम, अनिल यादव, शेखर पाटील, प्रमोद पाटील, इंद्रजित पाटील, शरदचंद्र पाठक, अरुणकुमार देसाई, महेंद्र बागे, विश्वनाथ माने, निजामसाहेब पाटील, बाबासाहेब पाटील, अमर यादव, रघुनाथ पाटील, संगीता पाटील-कोथळीकर, यशोदा कोळी, सचिव अशोक शिंदे, दादासाहेब काळे यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.

कारखान्याने ५० वर्षांच्या वाटचालीत शेतकरी सभासदांच्या विश्वासाच्या जोरावर आर्थिक स्थैर्य प्राप्त केले आहे, असे सांगून अध्यक्ष पाटील म्हणाले, गाळप क्षमतेबरोबर डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्पामुळे या प्रकल्पाचा नक्कीच शेतकरी सभासदांना फायदा होणार आहे. पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी हे प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे.

--

चौकट - अध्यक्षांनी मानले आभार

व्यवस्थापनाने नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. शेतकऱ्यांच्या उसाचा मोबदला एफआरपीप्रमाणे व्यवस्थापन वेळच्या वेळी अदा करीत असते. केंद्र शासनाने चालना दिल्यामुळेच आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे सभासदांनी या विषयाला मंजुरी दिली. याबद्दल अध्यक्ष पाटील यांनी सभासदांचे आभार मानले.

फोटो - १९०३२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - शिरोळ येथे दत्त साखर कारखान्याच्या ऑनलाइन सभेत अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संचालक उपस्थित होते.

Web Title: Approves expansion of Dutt's crushing capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.