वृक्षसंवर्धन काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:17 AM2021-07-19T04:17:32+5:302021-07-19T04:17:32+5:30
कोल्हापूर : वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे, हीच झाडे आपल्याला ऑक्सिजन देतील, शेंडा पार्क येथील झाडांच्या संवर्धनासाठी ...
कोल्हापूर : वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे, हीच झाडे आपल्याला ऑक्सिजन देतील, शेंडा पार्क येथील झाडांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशनतर्फे कृषी विभागाच्या जागेत हजार झाडे लावण्याचा प्रारंभ झाला. वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे आदी उपस्थित होते.
'माझं झाड, माझी जबाबदारी' या मोहिमे अंतर्गत ४० हजार झाडांचे लोकसहभागातून संवर्धन करण्यात येत आहे. डॉ. डी.वाय.पाटील ग्रुपने पाच हजार झाडे दत्तक घेतली. गतवर्षी येथील झाडे जळाली, तेथे दोन हजार झाडे लावली. उर्वरित हजार झाडे वृक्ष प्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन तसेच सामाजिक वनीकरण व कृषी विद्यापीठ लावत आहेत.
यावेळी वनीकरणचे वनपाल विकास घोलप, वनक्षेत्रपाल एम व्ही स्वामी, महापालिका गार्डन सहाय्यक अधीक्षक राम चव्हाण, डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके, वृक्षप्रेमी वेल्फेअरचे सतीश कोरडे, राहुल शहा, परितोष उरकुडे, विद्या पाथरे, सविता साळुंखे, सुनीता बुड्डे, अमृता वासुदेवन, निखिल शेटे, जयवंत नलावडे आदी उपस्थित होते.
आमदार अन् अर्जुनचे झाड
आमदार पाटील यांच्या हस्ते झाड लावले. कुतूहलापोटी त्यांनी त्या झाडाचे नाव विचारले, झाडाचे नाव अर्जुन सांगितले. माझ्या मुलाचेही नाव अर्जुन आहे आणि तुम्ही अर्जुन हे झाड माझ्या हस्ते लावले. हा भावनिक योग आहे, असे आ. पाटील यांनी सांगितले.
फोटो नं. १८०७२०२१-कोल-शेंडा पार्क ट्री
फोटो ओळी : कोल्हापुरात शेंडा पार्क येथे वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, सामाजिक वनीकरण व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. यावेळी अमोल बुड्डे, वनपाल विकास घोलप, एम व्ही स्वामी, राम चव्हाण, प्राचार्य डॉ. महादेव नरके आदी उपस्थित होते.
180721\18kol_1_18072021_5.jpg
फोटो ओळी : कोल्हापूरात शेंडा पार्क येथे वृक्ष प्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन, सामाजिक वनीकरण व कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. यावेळी अमोल बुड्डे, वनपाल विकास घोलप, एम व्ही स्वामी, राम चव्हाण, प्राचार्य डॉ. महादेव नरके आदी उपस्थित होते.