आजऱ्यासह परिसराला वळिवाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:22 AM2021-04-12T04:22:28+5:302021-04-12T04:22:28+5:30

गेल्या पंधरा दिवसांपासून आजरा शहरात प्रचंड उष्मा जाणवत होता. आज दुपारी २ वाजता जोरदार वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह पावसाला ...

The area, including Ajarya, was razed to the ground | आजऱ्यासह परिसराला वळिवाने झोडपले

आजऱ्यासह परिसराला वळिवाने झोडपले

Next

गेल्या पंधरा दिवसांपासून आजरा शहरात प्रचंड उष्मा जाणवत होता. आज दुपारी २ वाजता जोरदार वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. तब्बल दीड तास आजरा व परिसराला पावसाने झोडपून काढले. आजरा शहरात सुरू असलेले‌ गटारींचे बांधकाम निकृष्ट झाल्याने मध्येच पाणी साचले होते. तालुक्यातील खानापूर, देऊळवाडी, विटे, वाटंगी, मोरेवाडी, चाफवडे, चांदेवाडी, साळगाव, सोहाळे, गवसे, दर्डेवाडी, आल्याचीवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

अचानक आलेल्या पावसाने वीट व्यावसायिकांची धावपळ उडाली, तर काजू उत्पादकांचेही नुकसान झाले आहे. आल्याचीवाडी येथील देवराज मांडणीत व बांबू गर्गे यांच्या घरावर फणसाचे झाड पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तर रावू माडभगत, भाऊ माडभगत, प्रकाश माडभगत, गणपती माडभगत यांच्या घरांची कौले उडाली आहेत.

फोटो कॅप्शन -

१) आल्याचीवाडी (ता. आजरा) येथील देवराज माडभगत यांच्या घरावर कोसळलेले फणसाचे झाड.

२) पावसाने रस्त्याकडेला असलेल्या जमिनीत साचलेले पाणी.

Web Title: The area, including Ajarya, was razed to the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.