मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून पतीशी वाद, रागातून नवविवाहितेने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:48 PM2022-05-19T12:48:31+5:302022-05-19T12:48:52+5:30

सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला. मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून स्नेहा हिने राहत्या घरातील आडूला साडीने गळफास लावला.

Arguing with her husband for talking on mobile, the newlyweds got angry and strangled her, Incidents at Gadhinglaj | मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून पतीशी वाद, रागातून नवविवाहितेने घेतला गळफास

मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून पतीशी वाद, रागातून नवविवाहितेने घेतला गळफास

Next

गडहिंग्लज : मोबाइलवर बोलण्याच्या कारणावरून पतीशी झालेल्या वादाचा राग मनात धरून नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. स्नेहा निखिल डंगण्णावर (रा. नूल, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (दि. १७) दुपारी घडलेल्या या घटनेची गडहिंग्लज पोलिसात नोंद झाली आहे.

पोलीस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, नूल येथील निखिल रमेश डंगण्णावर हा बेळगावनजीकच्या होनगा येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. सहा महिन्यांपूर्वी बेळगाव येथील स्नेहा हिच्याशी विवाह झाला. मोबाईलवर बोलण्याच्या कारणावरून निखिल व स्नेहा यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून स्नेहा हिने राहत्या घरातील आडूला साडीने गळफास लावला.

मंगळवारी (दि. १७) दुपारी निखिल यांना जेवण वाढल्यानंतर अंघोळीला जाते, असे सांगून ती आतील खोलीत गेली. ती बराच वेळ बाहेर न आल्यामुळे नातेवाइकांनी दरवाजा उचकटून पाहिले असता, तिने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. येथील उपजिल्हा रुग्णालयातील उत्तरीय तपासणीनंतर तिच्यावर बेळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पती निखिल यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक शीतल सिसाळ अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Arguing with her husband for talking on mobile, the newlyweds got angry and strangled her, Incidents at Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.