अर्जुन कुंभार यांचा प्रवास प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:22 AM2021-03-14T04:22:24+5:302021-03-14T04:22:24+5:30
कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातून येऊनही जिद्दीने इंग्रजी सारख्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवलेले डॉ. अर्जुन कुंभार यांचा प्रवास ...
कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागातून येऊनही जिद्दीने इंग्रजी सारख्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवलेले डॉ. अर्जुन कुंभार यांचा प्रवास प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार शिवाजी विदयापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी शनिवारी काढले.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहात आयोजित मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक कॉलेजचे प्राचार्य, डॉ. अर्जुन कुंभार लिखित ‘अर्जुनाचे एकलव्यायन’ या आत्मकथनपर पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. माया पंडित, डॉ. जे. एफ. पाटील, डॉ. भालबा विभुते, डॉ.राजेंद्र कुंभार, डॉ. अच्युत माने उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, भाषेच्या प्रवासामध्ये आपण आपली ओळख विसरून जात आहोत. या पुस्तकामध्ये आपल्या भाषेची ओळख स्पष्टपणे दिसून येते. विद्यार्थी, शिक्षकांना इंग्रजीचे न्यूनगंड बाजूला ठेवून नवी उभारी देणारे हे प्रेरणादायी पुस्तक आहे.
डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी प्रतिकूल परिस्थिती असली तरी आजच्या विद्यार्थ्यांनी आपली जडण-घडण करताना कृतीतून योग्य उत्तर कसे द्यावे याची प्रेरणा पुस्तकातून मिळते असे मत व्यक्त केले. डॉ. माया पंडित यांनी इंग्रजी आत्मसात करण्यासाठी डॉ. कुुंभार यांनी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे असल्याचे मत मांडले.
डॉ. कुंभार यांनी आजच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी अवघड वाटत असेल तर हे पुस्तक त्यांना दिलासा देईल व विद्यार्थी, शिक्षकांना यामधून इंग्रजी शिकण्याची नव ऊर्जा मिळेल अशा शब्दांत मनोगत व्यक्त केले.
विठ्ठल कोतेकर यांनी सूत्रसंचालन केले.
--
फोटो नं १३०३२०२१-कोल-अर्जून कुंभार
ओळ : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात शनिवारी आयोजित कार्यक्रमात कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते डॉ. अर्जुन कुंभार लिखित अर्जुनाचे एकलव्यायन पुस्तकाचे प्रकाशन झाले.
--