सशस्त्र सेना ध्वज दिन : कोल्हापुरात वीरमाता, वीरपत्नींच्या सत्काराने वातावरण भावपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 11:50 AM2018-12-07T11:50:44+5:302018-12-07T11:58:09+5:30
वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार करताना वातावरण भावपूर्ण बनले. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ‘संभाजीराजे फाऊंडेशन’मार्फत हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कोल्हापूर : वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार करताना वातावरण भावपूर्ण बनले. सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ‘संभाजीराजे फाऊंडेशन’मार्फत हा आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
येथील छत्रपती संभाजीराजे फाऊंडेशनतर्फे सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त शुक्रवारी सकाळी आठ वाजता टेंबलाई हिल येथील १०९ टेरिटोरयिल आर्मी मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियन येथे एका विशेष कार्यक्रमात हा वीरमाता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार संभाजीराजे, संयोगिताराजे, परमजित कौर, कर्नल दिलीपसिंग मंडलिक, ले.कर्नल मिलिंद शिंदे आदिंनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.