सेना, भाजप, मोकाशी, भोसले गट एकत्र येणार?

By admin | Published: July 12, 2016 09:59 PM2016-07-12T21:59:36+5:302016-07-13T00:47:13+5:30

पन्हाळा पालिकेसाठी हालचाली गतिमान : पाटील गटाचे जनसुराज्य पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष

Army, BJP, Mokashi, Bhosale groups together? | सेना, भाजप, मोकाशी, भोसले गट एकत्र येणार?

सेना, भाजप, मोकाशी, भोसले गट एकत्र येणार?

Next

नितीन भगवान -- पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेसाठी नगरसेवकपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर शिवसेना-भाजप-मोकाशी-भोसले गट एकत्रित आघाडी स्थापन करून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत; तर पाटील गट जनसुराज्य पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहे.
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेसाठी १७ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. यापैकी नऊ महिला आहेत. सरासरी प्रत्येक प्रभागात १४४ मतदान असेल. दोन प्रभागांतील मतदान ३०० च्या आसपास असणार आहे. प्रत्येक मताला महत्त्व आहे. यावेळी थेट दोन पॅनेलमध्ये लढत होणार असून, भाजप-शिवसेनेनेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. मोकाशी-भोसले यांच्या गटाशी सलगी करत त्यांनी पन्हाळा विकास आघाडी स्थापन केली आहे. यात पाटील गट सहभागी होण्यास इच्छुक आहे; पण जनसुराज्य शक्ती पक्ष कोणती भूमिका घेणार, यावर त्यांचा आघाडीत जाण्याचा निर्णय ठरणार आहे. दुसरे पॅनेल जनसुराज्य शक्ती पक्षाचे असेल. या पक्षाची धुरा सलग दहा वर्षे पाटील गटाकडे होती. याचे प्रमुख विजय पाटील यांना बाजूला केले, तरच जनसुराज्यकडून आम्ही लढू, असा सूर विद्यमान नगरसेवकांमध्ये आहे. यातील काही नगरसेवक पन्हाळा विकास आघाडीमधून उभे राहण्यात इच्छुक आहेत. त्यामुळे मोकाशी व भोसले गटाचा सध्या वरचष्मा आहे. सर्वांत कमी मतदार असलेली नगरपालिका म्हणून पन्हाळा नगरपरिषद ओळखली जात आहे. या ठिकाणचे राजकारण नेहमीच गट पातळी आणि सलोख्याचे होते. पक्षपातळीवर येथील राजकारण कधीच झाले नाही. यावेळी मात्र पैशाचे राजकारण होणार आहे. विधान परिषदेवेळी नगरसेवकांची झालेली सहल, खरेदी, विमान प्रवास आणि मिळालेली भरघोस मदत, हे याचे कारण आहे.


पन्हाळा विकास आघाडीची जास्तीतजास्त भिस्त मोकाशी-भोसले गटावरच आहे. या गटाची सर्व जबाबदारी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगराध्यक्षांचे ज्येष्ठ बंधू बाळासाहेब मोकाशी हे करीत आहेत. त्यांच्याकडून सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू असून, ते काही मतदार व उमेदवारांना घेऊन अजमेर दर्ग्याच्या भेटीला निघाल्याचे समजते.


भोसले गटाचे कमलाकर भोसले हे ही माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांचे पुत्र सतीश भोसले हे माजी नगरसेवक आहेत. हे दोघे भोसले गटाची धुरा वाहत आहेत. यावेळी सतीश भोसले नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.

विरोधी जनसुराज्य शक्ती पक्षाची बाजू सध्या भक्कम नाही. त्यांना उमेदवार मिळविण्यासाठी कसरत करावी लागेल, अशी परिस्थिती आहे. पाटील गटाच्या इच्छुकांचा पन्हाळा विकास आघाडीकडे कल आहे. यावेळी नगरपरिषद निवडणुकीसाठी संपूर्ण गाव विकास आघाडीच्या बाजूला असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत.

Web Title: Army, BJP, Mokashi, Bhosale groups together?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.