सैन्यदल भरती प्रक्रिया : दुसऱ्या दिवशी ४९०० जणांनी दिली धावण्याची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 04:40 PM2018-12-07T16:40:54+5:302018-12-07T16:42:36+5:30
शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ४९०० जणांनी धावण्याची चाचणी दिली. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया दिवसभर सुरू राहिली.
कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर सुरू असलेल्या भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ४९०० जणांनी धावण्याची चाचणी दिली. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी आणि वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया दिवसभर सुरू राहिली.
या भरती प्रक्रियेस बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली. पहिल्या दिवशीच्या धावणे आणि मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुरूवारी दिवसभर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
सोलापूर, सांगली जिल्ह्यासाठी गुरूवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी सुमारे सहा हजार उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ४९०० जण प्रत्यक्ष सहभागी झाले. त्यांची धावण्याची आणि मैदानी चाचणी घेण्यात आली. सकाळी साडेसातपर्यंत प्रक्रिया सुरू होती.