कोल्हापूर शहराभोवती ४८५ कोटींचा रिंग रोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:23 AM2017-10-25T01:23:03+5:302017-10-25T01:24:12+5:30

कोल्हापूर : वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कोल्हापूर शहराभोवती करावयाच्या ८८ किलोमीटर लांबीच्या रिंग रोडला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

Around Rs. 485 crore ring road around Kolhapur city | कोल्हापूर शहराभोवती ४८५ कोटींचा रिंग रोड

कोल्हापूर शहराभोवती ४८५ कोटींचा रिंग रोड

googlenewsNext
ठळक मुद्दे२३ गावे : २८ रस्त्यांचा ८८ किलोमीटरचा समावेशवाहतूक ही कोल्हापूर शहरातून न जाता ती या नियोजित रिंग रोडवरून जाणार आहे. व्यापार-व्यवसायांबरोबरच पर्यटनासह अनेक कारणांनी शहरात येणाºया तसेच शहरातून मार्गस्थ होणाºया वाहनांची संख्याही बरीच वाढली

कोल्हापूर : वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कोल्हापूर शहराभोवती करावयाच्या ८८ किलोमीटर लांबीच्या रिंग रोडला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये २३ गावांमधील २८ रस्त्यांचा समावेश असून, यासाठी सव्वाचारशे कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला असून, यंदा ४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने हा मार्ग होत आहे. सर्वच्या सर्व म्हणजे नऊ ते दहा एंट्री पॉइंटचे रस्ते प्रशस्त आणि देखणे आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला मोलाची मदत होत आहे.

आता शहरांतर्गत वाहतूकही वाढली असून, शहरात बहुतांश सर्वच ठिकाणी वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे अनेक प्रसंग पाहायला मिळत आहेत. शहरात असणारी वाहने तसेच व्यापार-व्यवसायांबरोबरच पर्यटनासह अनेक कारणांनी शहरात येणाºया तसेच शहरातून मार्गस्थ होणाºया वाहनांची संख्याही बरीच वाढली आहे. त्यामुळे शहराच्या रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. तो काही अंशी कमी करण्यासाठी शहराबाहेरून काढण्यात येत असलेला रिंग रोड सर्वार्थांनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

कोल्हापूर शहराभोवतालच्या जवळपास २३ गावांतून जाणाºया या रिंग रोडमध्ये २८ रस्त्यांचा अंतर्भाव करून ८८.५२९ कि. मी. निव्वळ लांबी ६९.२८३ कि. मी. असा राज्यमार्ग क्र. १९४ अ म्हणून रस्ते विकास योजना २००१-२०२१ मध्ये समावेश करण्यात आला आहे. या नियोजित रिंग रोडमुळे पुणे, मुंबई, बेळगाव, सांगलीकडून येणारी व रत्नागिरी, गगनबावडा, गारगोटी, राधानगरीकडे मार्गस्थ होणारी वाहतूक व रत्नागिरी, गगनबावडा, गारगोटी, राधानगरीकडून येणारी व पुणे, मुंबई, बेळगाव, सांगलीकडे मार्गस्थ होणारी वाहतूक ही कोल्हापूर शहरातून न जाता ती या नियोजित रिंग रोडवरून जाणार आहे.

रिंग रोडमध्ये अंतर्भाव केलेली गावे
राष्टÑीय महामार्ग क्र. ४ जाजल पेट्रोल पंपापासून कणेरी, गिरगाव, नंदवाळ, वाशी, महे, कोगे, कुडित्रे फॅक्टरी, वाकरे फाटा, खुपिरे, यवलूज, वरणगे, केर्र्ली, निगवे, टोप, नागाव, मौजे वडगाव, हेर्ले, रुकडी फाटा, रुकडी बंधारा, चिंचवाड, वसगडे, सांगवडे, हलसवडे, विकासवाडी ते राष्टÑीय महामार्ग क्र. ४ जाजल पेट्रोल पंपाजवळ मिळणाºया रस्त्यापर्यंत एकूण २८ रस्त्यांचा अंतर्भाव या रिंग रोड प्रकल्पामध्ये करण्यात आला आहे.

रस्त्यांसाठी ६३४ कोटींचा निधी
गेल्या तीन वर्षांत मंत्री पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात रस्ते सुधारणा, रुंदीकरण, नवीन रस्ते, पुलांच्या कामांना विशेष प्राधान्य देऊन राज्य महामार्ग, जिल्हा व इतर मार्गांवर ६३४ कोटींचा निधी विविध योजनांमधून खर्च करण्यात आला आहे. त्याद्वारे ७१४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा करण्यात आली आहे.

तीन वर्षांत ३९ पुलांची कामे
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ३९ पुलांची कामे हाती घेण्यात आली. त्यांपैकी १५ कामे पूर्ण झाली असून २४ कामे प्रगतिपथावर आहेत. यामध्ये प्रामुख्याने पंचगंगा नदीवर राजाराम बंधारा- मोठा पूल बांधणे (१८ कोटी), आदमापूर गावाजवळ उड्डाणपूल (१८ कोटी), रुकडी गावाजवळ पंचगंगा नदीवर मोठा पूल (१२ कोटी) अशा आठ पुलांचा समावेश आहे.

Web Title: Around Rs. 485 crore ring road around Kolhapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.