कळे बॅँक दरोडा आंतरराज्य टोळीच्या दोघा भावांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:32 AM2019-03-04T11:32:38+5:302019-03-04T11:34:55+5:30

कळे येथील यशवंत सहकारी बँकेत दरोडा टाकून पाऊण कोटी लूट करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीतील दोघा भावांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली. चाँदखान अब्दुलनबी नईमखान (वय ४०, रा. इंदिरानगर मरोळ, अंधेरी ईस्ट मुंबई, मूळ, रा. ककराला, ता. दांतागंज, जि. बदायु-उत्तरप्रदेश) त्याचा भाऊ गुड्डू ऊर्फ तसद्दुअल्ली नईमखान (३८, रा. ककराला-उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत.

The arrest of two brothers of inter-state gang of bank robbery | कळे बॅँक दरोडा आंतरराज्य टोळीच्या दोघा भावांना अटक

कळे बॅँक दरोडा आंतरराज्य टोळीच्या दोघा भावांना अटक

Next
ठळक मुद्देकळे बॅँक दरोडा आंतरराज्य टोळीच्या दोघा भावांना अटकट्रकसह दरोड्याचे साहित्य जप्त : मुख्य सूत्रधारासह पाच साथीदारांचा शोध सुरू

कोल्हापूर : कळे येथील यशवंत सहकारी बँकेत दरोडा टाकून पाऊण कोटी लूट करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीतील दोघा भावांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली. चाँदखान अब्दुलनबी नईमखान (वय ४०, रा. इंदिरानगर मरोळ, अंधेरी ईस्ट मुंबई, मूळ, रा. ककराला, ता. दांतागंज, जि. बदायु-उत्तरप्रदेश) त्याचा भाऊ गुड्डू ऊर्फ तसद्दुअल्ली नईमखान (३८, रा. ककराला-उत्तरप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्या ताब्यातून ट्रकसह दरोड्यासाठी वापरत असलेले साहित्य जप्त केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. टोळीचा मुख्य सूत्रधार बाबू खान याच्यासह पाच साथीदार पसार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टोळीचा मुख्य सूत्रधार बाबू कौसर खान, गुड्डू ऊर्फ कालीया इसराक अल्ली खान, फसाहत ऊर्फ तहजीब आलम खानकल्लुखान, सेहवाज खान, राहुल (सर्व रा. ककराला-धनपुरा, बदायु-उत्तरप्रदेश) यांच्यासह ट्रक चालक चाँदखान नईमखान, त्याचा भाऊ गुड्डू नईमखान यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तरप्रदेश, आदी राज्यांत दरोड्याचा धुमाकूळ घातला आहे. रेकी करून ते दरोडा टाकत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. कळे बँकेतील रोकड आणि सोन्याचे दागिने म्होरक्या बाबू खान याच्याकडे आहे.

यशवंत बॅँकेत मोठ्या प्रमाणात रोकड व दागिने आहेत, याचा अंदाज घेत चोरट्यांनी बॅँकेची रेकी करून ७ फेब्रुवारीला दरोडा टाकला होता. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांना एक शाल मिळून आली होती.

तसेच तपास करीत असताना कळे ते कोल्हापूर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, दरोड्यासाठी पांढऱ्या रंगाच्या ट्रकचा वापर केल्याचे दिसून आले. त्यानुसार ठाणे, भिवंडी, नवी मुंबई या ठिकाणी तपास करून ट्रकचा नंबर (एम. एच. ०४ जीसी ४६९८) प्राप्त केला. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ट्रकच्या मालकाचे नाव, पत्ता मिळविला असता, भिवंडी येथील शहजादे चाँद खान याच्या नावे असल्याचे दिसून आले.

पत्त्यावर चौकशी केली असता, ट्रकचे रजिस्ट्रेशन करण्यापुरता पत्ता वापरला असल्याचे निष्पन्न झाले. सहायक निरीक्षक किरण भोसले, उपनिरीक्षक सचिन पंडित, कॉन्स्टेबल राजेश आडुळकर, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, अजित वाडेकर, नितीन चोथे, रणजित कांबळे या पथकाने भिवंडी, मरोळ, अंधेरी, नवी मुंबई, आदी भागांत ट्रकचालक व मालकाचा शोध घेतला असता, गॅस कटरने बँक दरोडा टाकणारी सराईत टोळी ककराला-उत्तरप्रदेश या ठिकाणी वास्तव्यास असून, त्यांची रेकॉर्डवरील प्राथमिक माहिती मिळाली.

ककराला या ठिकाणी चौकशी केली असता, ट्रकचा मालक चाँद खान व त्याचा भाऊ गुड्डू खान यांची माहिती मिळाली. गुड्डू हा दिल्लीतील भजनपुरा-जमुना विहार भागात अस्तित्व लपवून राहत असल्याबाबत माहिती मिळाली.

दिल्ली येथे चार दिवस पथकाने तळ ठोकून एका महिलेच्या घरात वास्तव्यास असलेल्या गुड्डूच्या मुसक्या आवळल्या. त्याला खाकी दाखविताच त्याने गुन्ह्यात वापरलेला ट्रक भाऊ चाँद खान वापरत असून, तो मुंबईतील इंदिरानगर येथील झोपडपट्टीत राहत असल्याची कबुली दिली. तेथून चाँदला ट्रकसह ताब्यात घेतले.

दोघा भावांकडे चौकशी केली असता, त्यांनी कळे बँकेच्या दरोड्याची कबुली दिली. ट्रकमध्ये शाल, गॅसटाकी, कटावण्या, स्क्रुड्राईव्हर, केमिकल, कटर मिळून आले. त्यांच्या अन्य साथीदारांना चाहुल लागताच ते पसार झाले. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
 

 

Web Title: The arrest of two brothers of inter-state gang of bank robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.