चोरी करणाऱ्या परराज्यांतील टाेळीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:31 AM2021-08-14T04:31:02+5:302021-08-14T04:31:02+5:30

जयसिंगपूर : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला गजाआड करण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास साखळे मळा आंबेडकर ...

Arrested for stealing from foreign countries | चोरी करणाऱ्या परराज्यांतील टाेळीला अटक

चोरी करणाऱ्या परराज्यांतील टाेळीला अटक

Next

जयसिंगपूर : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला गजाआड करण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास साखळे मळा आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर येथे चोरी करण्यास आलेल्या संशयितांचा शोध घेऊन चोवीस तासांत पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

अक्षय सदाशिव प्रधान (वय २१, रा. सणबलीपाशी, ता. पुरूनाघर, ओडिशा), शिवराम संतोष बगेल (१९, रा.संतोषी कुम्हली बस्तर आमागुडा छत्तीसगढ), अनिल निलसॉन मुंडा (२८, रा. बिजादिही, ता. थयनाल, ओडिशा), महेश गोविंद निसाण (२०, रा. गोबडीयाळी, बिडाबहाल, ओडिशा), राहुल सुरज हुमले (१८, रा. जगदलपूर, छत्तीसगढ) अशी संशयितांची नावे आहेत.

येथील जयसिंगपूर प्रथम वर्ग न्यायालयाने संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

आंबेडकर सोसायटीजवळ संतोष भाईगडे यांच्या घरात तक्रारदार अश्विनी किरण पाटील हे कुटुंब भाड्याने राहते. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास संशयित आरोपींनी घरातील खिडकीची काच फोडून लोखंडी रॉडच्या साहाय्याने खिडकीजवळ असलेली पर्स काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जागे झालेल्या अश्विनी यांनी पर्स हाताने ओढून घेतली. याचदरम्यान दुसऱ्या संशयिताकडून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुरू होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घरमालक त्याठिकाणी येत असताना चोरटे पसार झाले. याचवेळी दोघा चोरट्यांचे मोबाईल खाली पडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने कोरे मंगल कार्यालयाशेजारी तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर आणखी दोघांच्या मुसक्या आवळल्या.

सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.

-------------------------

संशयित सहा महिन्यांपासून वास्तव्यास

संशयितांनी आणखी गुन्हे केल्याचा संशय आहे. चोरीच्या वेळी दोघा संशयितांचे मोबाईल घटनास्थळी पडल्याने पोलिसांना तपास कामात पुरावे मिळाले आहेत. राहुल हुमले हा संशयित गेल्या सहा महिन्यांपासून कोरे मंगल कार्यालयाशेजारी वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडूनच उर्वरित संशयितांची नावे पुढे आली आहेत.

Web Title: Arrested for stealing from foreign countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.