बेळगाव विमानतळावर एअर बसचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:23 AM2021-02-07T04:23:54+5:302021-02-07T04:23:54+5:30

झाले. ४ वर्षांपूर्वी विमानतळाची धावपट्टी अधिक विस्तृत करून वाढविण्यात आल्यानंतर आज प्रथमच व्यावसायिक एअरबस विमानाचे आगमन बेळगाव विमानतळासाठी अत्यंत ...

Arrival of Air Bus at Belgaum Airport | बेळगाव विमानतळावर एअर बसचे आगमन

बेळगाव विमानतळावर एअर बसचे आगमन

Next

झाले. ४ वर्षांपूर्वी विमानतळाची धावपट्टी अधिक विस्तृत करून वाढविण्यात आल्यानंतर आज प्रथमच व्यावसायिक एअरबस विमानाचे आगमन बेळगाव विमानतळासाठी अत्यंत संस्मरणीय ठरले. इंडिगो ए -३२० हे खास एअर बस केएलई - युएसएमच्या १३२ मलेशियन विद्यार्थ्यांना घेऊन दुपारी बेळगाव विमानतळावर दाखल झाले. मलेशियाहून आलेल्या इंडिगो ए -३२० एअरबसचे आज दुपारी ४ वाजता विमानतळावरील अग्निशामक दलातर्फे दोन्ही बाजूंनी आकाशात उंच पाण्याचे फवारे सोडून स्वागत करण्यात आले.

हे विमान क्वालालंपूर येथून चेन्नईमार्गे बेळगावला आले असून, पुन्हा ते चेन्नईला रवाना होईल. त्याचप्रमाणे मलेशियाहून विद्यार्थ्यांना घेऊन येणारी आणखी एक एअर बस रात्री ८ वाजता बेळगाव विमानतळावर लँड होणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शहरात शिक्षण घेणारे मलेशियन विद्यार्थी मायदेशी रवाना झाले होते. आता प्रादुर्भाव निवळल्यामुळे आपले शिक्षण पूर्ववत पुढे सुरू ठेवण्यासाठी हे विद्यार्थी आज पुन्हा बेळगावला परतत आहेत. बेळगावातील केएलई संस्था आणि मलेशियन विश्वविद्यालय यांच्यातील शैक्षणिक करारांतर्गत सुमारे ३२० मलेशियन विद्यार्थी बेळगावात शिक्षण घेत आहेत. कोरोना प्रादुर्भावाची तीव्रता वाढल्यामुळे गेल्यावर्षी एप्रिल २०२० मध्ये यापैकी बहुतांश विद्यार्थी माघारी आपल्या घरी मलेशियाला गेले होते. त्याचप्रमाणे उर्वरित विद्यार्थी बेळगावातच वास्तव्यास होते. कोरोना प्रादुर्भाव निवळून शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाल्यामुळे आता माघारी गेलेले २७२ मलेशियन विद्यार्थी पुन्हा बेळगावात येत आहेत. त्यांच्यासाठी खास दोन एअर बस विमानांची सोय करण्यात आली आहे. त्यापैकी दुपारी ४ वाजता आलेल्या विमानातून १३२ विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि आता रात्री ८ वाजता येणाऱ्या विमानांमधून १४० विद्यार्थी-विद्यार्थिनी बेळगावात दाखल होतील, अशी माहिती बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिली आहे.

Web Title: Arrival of Air Bus at Belgaum Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.